सिंदेवाही : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोनवाही येथील शिक्षिका रजनी साळवे या शिक्षिकेने तिसऱ्या वर्गातील एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याने त्या शिक्षिकेला शाळेतून हटविण्यासाठी लोनवाही येथील पालकांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे दालनात ठीया दिला होता. अखेर गटविकास अधिकारी यांनी सदर शिक्षिकेला बदलून देण्याचे आश्वासन दिले असल्याने पालकांनी माघार घेतले.# khabarkatta Chandrapur
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोनवाही ही दोन शिक्षकी शाळा असून एकूण 39 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही शाळा पंचायत समिती कार्यालयाच्या शेजारी असूनही मागील अनेक दिवसापासून शिक्षिका रजनी साळवे यांचा विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने पालकांनी या बाबत गट विकास अधिकारी यांना सदर शिक्षिकेला हटवण्यासाठी विनंती अर्ज दिला होता. परंतु गट विकास अधिकारी यांनी दुर्लक्ष केले, असल्याने शिक्षिकेने विद्यार्थ्यांना त्रास देणे सुरूच ठेवले.# khabarkatta Chandrapur
सदर शिक्षिकेने गुरुवारी एका तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी पंचायत समिती सिंदेवाही गट विकास अधिकारी यांचे दालनात ठिया देऊन शिक्षिका रजनी साळवे यांना त्वरित हटविण्याची मागणी केले. गटविकास अधिकारी यांनी सदर शिक्षिकेला बोलावून समज दिले. मात्र पालकांनी शिक्षिकेला हटविण्याची मागणी लावून धरल्याने मंगळवारी त्या शिक्षिकेला हटविण्याचे पालकांना आश्वासन दिले.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रणय धोंगडे, कक्ष अधिकारी मेश्राम, नगरसेवक पंकज नन्नेवार, शाळेचे मुख्याध्यापक जीवन डोंगरे, पत्रकार जितेंद्र नागदेवते, इत्यादी उपस्थित होते.
Sindewahi:
After Rajni Salve, a teacher of Zilla Parishad Primary School, Lonwahi, beat up a third class student, the parents of Lonwahi gave a letter to the Panchayat Samiti Group Development Officer in the hall to remove the teacher from the school. Finally, the group development officer promised to replace the said teacher, so the parents withdrew.
Zilla Parishad Primary School Loanwahi is a two teacher school with a total of 39 students studying. Although this school is next to the Panchayat Samiti office, since the teacher Rajni Salve has been troubling the students for the past several days, the parents had submitted a request to the Group Development Officer to remove the said teacher. But being ignored by the Group Development Officer, the teacher continued to harass the students.
After the said teacher brutally beat up a third class student on Thursday, the parents of the students demanded that the Panchayat Samiti Sindewahi Group Development Officer be removed from the hall immediately. Group development officer called the said teacher and explained. But as the parents demanded the removal of the teacher, he assured the parents to remove the teacher on Tuesday.
Assistant Group Development Officer Pranay Dhongde, Chamber Officer Meshram, Corporator Pankaj Nannewar, School Principal Jeevan Dongre, Journalist Jitendra Nagdevate, etc. were present on this occasion.#khabarkatta chandrapur