भीषण अपघात : दुचाकीस्वारला वाचविण्याच्या नादात बस पालटली - दोन जागीच ठार, प्रवासी जखमी - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



भीषण अपघात : दुचाकीस्वारला वाचविण्याच्या नादात बस पालटली - दोन जागीच ठार, प्रवासी जखमी

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:
चामोर्शी - मुल महामार्ग येथे एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. आज दि. 13/02 रोजी सकाळी 8 च्या सुमारास घडली.या मार्गावर मोटार सायकल आणि एसटी बस यांच्यात जोरदार टक्कर झालीदुचाकीस्वार ला वाचविण्याच्या नादात बस पालटली आणि बस मधील 25 प्रवासी जखमी झाले

दुचाकीस्वार हे मुल येथून चानोर्शी येथे जाणारे होते आणि एसटी बस चामोर्षी येथून मुल मार्गावर जाणारी होती.बस चालक दुचाकीस्वार ला वाचविण्याच्या नादात अपघात झाला, या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाले व बस मधील 25 प्रवासी जखमी झाले. घटनेनंतर पोलिस घटना स्थळी दाखल झाली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम एच 07 सी 9158 ही मुल वरून चामोर्शी ला जात असताना मुल वरून 2 कि. मी. वर असलेल्या उमानदी च्या पुला अगोदर असलेल्या एका छोट्या पुलाजवळ दुचाकी स्वाराने समोर असलेल्या चारचाकी वाहणाला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. त्यात दोन्ही दुचाकिस्वार जागीच ठार झाले. तर बस मधील प्रवासी मात्र सुखरूप बचावले. दुचाकी स्वारांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस पलटी झाल्याची माहिती बसच्या चालकांनी आमच्या प्रतिनिधी ला दिली असून बस मधील काही प्रवश्याना किरकोळ मार लागला आहे. या घटनेची माहिती पोलीसाना होताच घटना स्थळावर धावून आले मृतदेह शवविच्छेदना करिता उपजिल्हा रुग्णालय मुल येथे पाठवण्यात आले आहे.

Pages