काँग्रेस च्या राष्ट्रीय अधिवेशन समितीत धानोरकर दांपत्यास स्थान नाही! : महाराष्ट्रातून 12 नेत्यांचा समावेश #INC - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



काँग्रेस च्या राष्ट्रीय अधिवेशन समितीत धानोरकर दांपत्यास स्थान नाही! : महाराष्ट्रातून 12 नेत्यांचा समावेश #INC

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राजकीय -

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रायपूर येथे नियोजित राष्ट्रीय अधिवेशनासाठी विविध समित्या जाहीर करण्यात आल्या असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे राजकीय व्यवहार उपसमितीचे निमंत्रक पद सोपविण्यात आले आहे. सोबतच मसुदा समितीमध्येही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. नाना पटोले यांना शेतकरी व कृषी उपसमितीचे सदस्य करण्यात आले आहे.

24 ते 26 फेब्रुवारीच्या दरम्यान रायपूर येथे होणाऱ्या या अधिवेशनासाठी काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी गठीत केलेल्या विविध समित्यांची यादी शनिवारी राष्ट्रीय महासचिव खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केली. अशोक चव्हाण यांच्यासमवेत खासदार मुकुल वासनिक व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही मसुदा समितीचे सदस्य असतील. वासनिक यांच्याकडे सामाजिक न्याय व सक्षमीकरण उपसमितीचे अध्यक्षपदही देण्यात आले आहे.

राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोराकर व आमदार पत्नी चा समावेश नसल्याने चर्चा

या अधिवेशनाच्या आयोजनकरिता एकूण राष्ट्रीय स्तरावर 8 समित्या तयार करण्यात आल्या असून यात देशभरातील 121 काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. मात्र राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोराकर व आमदार पत्नी चाही समावेश नसल्याने याबाबत चर्चा रंगली आहे त्याचबरोबर तर्कवितर्क लढविले जात आहेत.

राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिका अर्जुन खडके यांच्या नेतृत्वात रायपूर येथे होत आहे.यासाठी देशभरातून देशभरातील काँग्रेसच्या 121 नेत्यांना विविध जबाबदारी देण्यात आलेली आह. महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यासह 12 पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे, मात्र महाराष्ट्रातून निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर आणि त्यांची आमदार पत्नी प्रतिभा धानोरकर यांना मात्र कुठलीही जबाबदारी या कमिटीमध्ये देण्यात आलेली नाही. या सूचीमध्ये धानोरकरांना स्थान देण्यात न आल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

यासाठी धानोरकर दांपत्याची निष्क्रियता कारणीभूत आहे का यावर देखील आता उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे. खासदार बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातून काँग्रेसच्या तिकिटातून निवडून आलेले एकमेव खासदार आहेत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या विरोधातला मतदार धानोकर यांच्याकडे वळता झाला मात्र जनतेच्या अपेक्षे बाबत धानोरकर मतदारांच्या अपेक्षववर खरे उतरले का यावर साशंकता आहे. याच दरम्यान धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोळकर या देखील काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या त्यांच्याबाबत देखील हीच संभ्रमाची स्थिती आहे.

पक्षश्रेष्ठी देखील पक्षश्रेष्ठी देखील धानोरकर दांपत्याच्या एकूणच कारभार आणि कार्यावर खुश नसल्याच्या चर्चा आहे अशातच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात होणारा रायपूर येथील अधिवेशनात विविध समित्या तयार करण्यात आलेले आहे तब्बल 100 च्या वर पदाधिकाऱ्यांना यात स्थान देण्यात आलेले आहे मात्र धानोरकर दांपत्यापैकी कुणालाही याची जबाबदारी देण्यात आलेली नाही.

अशा आहेत समित्या! विजय वडेट्टीवारांनाही संधी

मसुदा समिती देशभरतील 21 सदस्यांमध्ये मध्ये महाराष्ट्रातील तीन अशोक चव्हाण, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समाविष्ट आहे.

राजकीय व्यवहार उपसमितीमध्ये माजी मंत्री नसिम खान व आमदार यशोमती ठाकूर यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

आर्थिक व्यवहार उपसमितीमध्ये माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, आमदार प्रणिती शिंदे व माजी मंत्री आमदार नितीन राऊत यांना सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.

खासदार मुकुल वासनिक अध्यक्ष असलेल्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण उपसमितीत माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आ. विजय वडेट्टीवार सदस्य आहेत.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शेतकरी व कृषी उपसमितीचे सदस्य करण्यात आले आहे.

युवा, शिक्षण व रोजगार समितीमध्ये माजी शिक्षण मंत्री आ. वर्षा गायकवाड यांना स्थान देण्यात आले आहे.

Pages