प्रेम संबंधातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



प्रेम संबंधातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावरअत्याचार करण्यात आल्याची घटना दि. 12 फेब्रुवारीला उघडकीस असल्याने गावात खडबड उडाली आहे. निखिल प्रकाश यलकुतवार (19) असे आरोपीचे नाव आहे.

शहरात राहणाऱ्या आरोपी निखीलने सदर अल्पवयीन मुलीला प्रेमपाश्यात अडकविले व तिचेशी शारिरीक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलीच्या आईने बल्लारपुर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी त्वरित आरोपीस अटक केली आहे.

पोलिस माहितीनुसार अल्पवयीन मुलीचे आरोपी निखील याच्यासोबत मागील चार वर्षापासून - प्रेमसंबंध होते. जुलै 2022 मध्ये अल्पवयीन मुलीला आरोपीने त्याचे राहते घरी घेवून गेला व त्यानंतर - वारंवार बळजबरीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

दरम्यान पिडीत मुलीच्या आईला तिच्या लक्षणांवरून शंका येताच तिने तिला रुग्णालयात घेवून गेली. तिथे अल्पवयीनला तपासून ती गरोदर असल्याचे सांगितले. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान पिडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.

Pages