राज्यात आता आरएफओ रेंजनिहाय साकारणार वनकोठडी - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राज्यात आता आरएफओ रेंजनिहाय साकारणार वनकोठडी

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:
गतवर्षीच्या आढावा बैठकीत वनकोठडी निर्माण करण्याविषयी चर्चा झाली होती. वनगुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी वनकोठडी आवश्यक असल्याचे मत वरिष्ठांचे होते. त्यानुसार, हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, आता लवकरच राज्यभरात वनकोठडी साकारल्या जातील त्यामुळे वनाधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करणे सुकर होईल. - सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
अमरावती : सागवान, चंदन वृक्षांसह वन्यजीव, दुर्मीळ वनस्पती तस्करीप्रकरणी अटकेतील आरोपींना जेरबंद करणे आणि न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्यात वनपरिक्षेत्रनिहाय वनकोठडी साकारल्या जाणार आहे. त्याअनुषंगाने अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी प्रादेशिक, वन्यजीव विभागाकडून वनकोठडीबाबतचे प्रस्ताव मागविले आहे. साधारणतः 428 वनकोठडी निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे.

राज्याच्या वनविभागाचा प्रादेशिक, सामाजिक वनीकरण आणि वन्यजीव विभाग असे एकूण 900 वनपरिक्षेत्रनिहाय कारभार चालतो. मात्र, अमरावती व चंद्रपूर वगळता अन्य कोणत्याही जिल्ह्यात वनकोठडी नसल्याची माहिती आहे. अलीकडे वन्यजीव, सागवान आणि चंदन वृक्ष, दुर्मीळ वनस्पतीची तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किंबहुना वनगुन्ह्यात आरोपीला अटक केली असता स्वतंत्र वनकोठडी नसल्याने त्या आरोपीला पोलिस कोठडीत ठेवावे लागते.
त्याकरिता वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना पोलिसांशी पत्रव्यवहार करावालागतो. त्यानंतर वनगुन्ह्यातील आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याची परवानगी मिळते.मात्र,वनगुन्ह्यातील आरोपीला पोलिस कोठडीत ठेवताना संरक्षण म्हणून वनपाल, वन कर्मचाऱ्यांना तैनात राहावे लागते. परिणामी, वनगुन्ह्यात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आणि वन्यजीव विभागात न वनपरिक्षेत्रनिहाय वनकोठडी साकारण्यासाठी वनविभागाच्या , अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुय्यम संवर्ग) सुभिता न विश्वास यांनी जागेसह प्रस्ताव त मागविले आहे.

Pages