खबरकट्टा/चंद्रपूर:
पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मृतदेह कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला.
मंगीलाल चव्हाण असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. मंगीलाल यांची नुकतीच वडगाव जंगल पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. त्यांचा विवाहसुद्धा ठरला होता. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र आता त्यांच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
दरम्यान मंगीलाल चव्हाण हे रविवारी हॉटेल मकरंदमध्ये मुक्कामी थांबला होते. मात्र सकाळी त्यांचा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृत मांगीलाल यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. दुसरीकडे मंगीलाल यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.