खासदार साहेबांनी देखील याचा पाठपुरावा केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. अशातच विरोधी पक्ष नेते आणि शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे हे धारिवाल कंपनीतील प्रशासनाची आणि शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान आता ते काय पाऊल उचलणार आहेत आणि उचलणाऱ्या पावलांची पूर्तता होणार का,. की अन्य राजकारण्याप्रमाणे केवळ बंद तर चर्चा होऊनच विषयाची समाप्ती होईल याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
धारिवाल वीज उत्पादन कंपनी ही राजकारणासाठी नेमकी काय चीज आहे हे अजूनही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर आहे.याच धारिवाल कंपनीचा विरोधात अनेक राजकारणाने आंदोलन केले मात्र " ना कंपनीवर कुठली कारवाई झाली ना स्थानिकांना न्याय मिळाला " मात्र यानंतरही आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर राजकारणी मात्र गप्प झाले.
नुकतेच खासदार बाळू धानोरकर यांनी धारिवाल कंपनी विरोधात आंदोलन पुकारले होते. यादरम्यान प्रशासनाने चौकशी अहवालात धारीवाल कंपनी विरोधात अत्यंत गंभीर असे शेरे नोंदवले होते. मात्र,त्याचे अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. खासदार बाळू धानोरकरांनी देखील याचा पाठपुरावा केला नाही.यापूर्वी असेच आंदोलन आमदार किशोर जोरगेवार,तर त्यापूर्वी शोभा फडणवीस यांनी केले होते.मात्र,यानंतर त्यांनी हा पाठपुरावा थांबवला, धारीवाल कंपनी विरोधात कुठलीही कारवाई झाली नाही. आणि स्थानिकांचे प्रश्न दशकाणू दशके अद्याप प्रलंबित आहेत.
आता नुकतेच राज्याचे विरोधी पक्षनेते तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे हे चंद्रपूरच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या दौऱ्यात धारिवाल कंपनीचा देखील उल्लेख आहे. काँग्रेसच्या खासदारांनी आंदोलन आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर दानवे धारिवाल कंपनीमध्ये जाऊन स्थानिका स्थानिक समस्यांचा आढावा तसेच कंपनी प्रशासनाची चर्चा करणार आहे. त्यामुळे राजकीय उलट सुलट चर्चानां पेव फुटले आहे.
कारण नुकत्याच रायपूर येथे होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्याचे एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर यांना कुठले स्थान देण्यात आले नव्हते.अशातच धानोळकरांकडून धारीवाल बाबत प्रश्न प्रलंबित असताना दानवे नेमके काय करणार आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
यापूर्वी माजी आमदार शोभा फडणवीस यांनी देखील धारिवाल कंपनीच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले होते.चुकीच्या पद्धतीने पाणीपुरवठा हो करण्यात येत असून यामधून शासनाचा मोठ्या प्रमाणात कर बुडवण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोप फडणवीस यांनी केला होता त्या संदर्भात त्यांनी आंदोलन देखील केले होते मात्र यानंतर त्याचा कुठलाही सोक्षमोक्ष लागला नाही.
त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी देखील धारिवाल कंपनी विरोधात स्थानिकांना रोजगार तसेच प्रदूषणाच्या समस्या घेऊन जोरदार आंदोलन केले होते यानंतर प्रशासन आणि धारीवाल कंपनीचे अधिकारी यांच्या समक्ष जोरगेवार याची बैठक पार पडली. मात्र,यानंतर धारीवाल कंपनीने कुठलेही प्रश्न मार्गी लावले नाही.
अशातच मागील डिसेंबर महिन्यात खासदार बाळू धानोरकर यांनी धारिवाल कंपनीच्या विविध प्रश्नां विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र सहा डिसेंबर ला होणारे हे आंदोलन त्यांनी स्थगित केले.
यानंतर प्रशासनाकडून एक समिती नेमण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली. ज्यामध्ये कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, भूसंपादन उपप्रादेशिक परिवहन,विभाग अशा विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. चौकशी दरम्यान धारिवाल कंपनीच्या विरोधात अनेक गंभीर बाबी या अहवालात नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये अवैधरित्या नदीच्या पात्रामध्ये बांधकाम करून पंप लावलात आल्याचा शेरा देण्यात आलेला होता. तसेच स्थानिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे देखील यामध्ये नमूद केले होते.मात्र यानंतरही कुठल्याही एका प्रश्नाचा निकाल प्रशासनाने लावला नाही.
खासदार साहेबांनी देखील याचा पाठपुरावा केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. अशातच विरोधी पक्ष नेते आणि शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे हे धारिवाल कंपनीतील प्रशासनाची आणि शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान आता ते काय पाऊल उचलणार आहेत आणि उचलणाऱ्या पावलांची पूर्तता होणार का,. की अन्य राजकारण्याप्रमाणे केवळ बंद तर चर्चा होऊनच विषयाची समाप्ती होईल याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.