वाघ नख विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



वाघ नख विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना दि.10/02/2023 रोजी गोपनीय माहिती मिळाली की चंद्रपूर बेनार चौक मल्लेलवार देशी दारूचे दुकानाचे बाजूला एक इसाम वाघाचे दात स्वतः जवळ बाळगून ते विकण्याकरिता फिरत आहे. अशा खबरे वरून वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन चंद्रपूर, वन विभाग चंद्रपूर श्री. आर. डी. बोरुडे व त्यांचे पथकांचा बाजार करून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स.पो.नि.भोयर यांचे अधिपत्या खाली दोन पथक तयार करून मिळालेल्या खबरेप्रमाणे बेनार चौक मल्लेलवार देशी दारूचे दुकानाजवळ गेले असता तेथे खबरेप्रमाणे इसम नामे प्रवीण नरसय्या बोडू ( 35 ) वर्षे रा. लालपेठ कॉलरी नं.03 रेल्वे लाईन जवळ, चंद्रपूर हा मिळून आला त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे फुलपॅन्टचे खिशात एका प्लास्टिक पिशवी मध्ये वन्य प्राण्याचे दोन दात मिळून आले.

सदर दोन्ही दात पंचासमक्ष पुरव्या कामी जप्त करून ताब्यात घेतले असून नमूद इसमा विरुद्ध वनकायदया अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, स.पो. नि. मंगेश भोयर, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. घोरुडे,पो. हवा. धनराज करकाडे, प्रमोद डंबारे, ना.पो.कॉ. संतोष येल्पुलवार, दिनेश खराडे, पो.कॉ. नरेश डाहुले, गोपाल आतकुलवार, रवींद्र पंधरे, प्रांजल झिलपे, कुंदन बावरी, नितीन रायपुरे व वनविभागाचे पथक यांनी केली असून गुन्हायाचा पुढील तपास वन विभाग, चंद्रपूर हे करीत आहे.

Pages