चंद्रपूर जिल्हयात पुन्हा बनावट कारखाना - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर जिल्हयात पुन्हा बनावट कारखाना

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
मूल तालुक्यातील चितेगाव येथील बनावट दारुचा कारखान्याचे प्रकरण ताजे असतानाच चक बोर्डा येथे सुद्धा असाच प्रकार समोर आला. एका घरात देशी-विदेशी बनावट मद्य तयार केले जाते होते. या कारवाईत शशिम प्रेमानंद कांबळे याला अटक केली आहे. एक लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चकनिंबाळा मार्गावरील चक बोर्डा गावातील कांबळे यांच्या शेतातील घरात मध्ये बनावट देशी- विदेशी मद्य तयार केले जात असल्याचा माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर आज शुक्रवारला या घरावर छापा टाकण्यात आला.

घटनास्थळी दारु तयार करण्याचे साहित्य हाती लागले. देशी दारुच्या तीनशे रिकाम्या बॉटल मिळाल्या. दारुबंदी हटून जवळपास दीड वर्षांचा कालावधी होत आहे. दारूबंदी बनावट दारु यायची. त्यामुळे अनेकांचे जीव गेले. दारुबंदी हटविण्यात याच बनावट दारुचा सुद्धा एक मुद्दा होता. मात्र आता दारु सुरु झाल्यानंतर बनावट दारुचे कारखाने जिल्ह्यात सापडत आहे. लगतच्या गडचिरोली आणि ग्रामीण भागात ही दारु पोहचती केली जाते. उत्पादन शुल्क विभागाची एका महिन्यातील ही दुसरी कारवाई आहे. परंतु या रॅकेटचा मोह्क्या त्यांच्या हाती अद्याप लागला नाही.

Pages