“मुख्यमंत्री शिंदेंनी दिली होती खुली ऑफर”; राज्यातील काँग्रेसच्या एकमेव खासदाराचा गौप्यस्फोट; - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



“मुख्यमंत्री शिंदेंनी दिली होती खुली ऑफर”; राज्यातील काँग्रेसच्या एकमेव खासदाराचा गौप्यस्फोट;

Share This
राज्यात सत्तांतर झाले तेव्हा शिंदे यांनी आम्हा धानोरकर दाम्पत्याला सोबत येण्याची खुली ऑफर दिली होती : काँग्रेस खासदाराचा गौप्यस्फोट
खबरकट्टा / चंद्रपूर : राजकीय -

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. राज्यात सत्तांतर होत असताना वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आणि माझ्या पत्नीला सोबत येण्याची खुली ऑफर दिली होती, असे धानोरकर यांनी म्हटले आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या सहा दिवसीय महाकाली क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन खासदार धानोरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत धानोरकर यांनी हा गौप्यस्फोट केला.

मंचावर बसलेल्या नव्वद टक्के नेत्यांचा डीएनए हा शिवसेनेचा आहे. आज आम्ही काँग्रेस पक्षात असलो तरी रक्तात व विचारात बाळासाहेबांची शिवसेना आहेच. राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

राज्यात सत्तांतर झाले तेव्हा शिंदे यांनी आम्हा धानोरकर दाम्पत्याला सोबत येण्याची खुली ऑफर दिली होती. परंतु आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत. जोरगेवार अपक्ष आमदार आहेत. त्यांच्यासमोर अनेक पर्याय आहेत. मात्र, भाजपाकडून त्यांना चंद्रपुरातून विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही, हे सत्य आहे. त्यांच्यासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अथवा शिवसेना हेच पर्याय आहेत. भविष्यात ते यापैकी एका पक्षाकडून निवडणूक लढू शकतात, असेही धानोरकर म्हणाले.

Pages