चंद्रपूर जिल्ह्यातील रमाई आवास योजने अंतर्गत एकूण 2178 घरकुल मंजूर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित #ramai_awas_yojna #sudhir_mungantiwar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर जिल्ह्यातील रमाई आवास योजने अंतर्गत एकूण 2178 घरकुल मंजूर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित #ramai_awas_yojna #sudhir_mungantiwar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर, दि. 24 :

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजने अंतर्गत एकूण 2178 घरकुल मंजूर करण्यात आलेली आहे.A total of 2178 houses sanctioned under the Ramai Awas Yojana in Chandrapur district is the result of the efforts of Guardian Minister Sudhir Mungantiwar #ramai_awas_yojna #sudhir_mungantiwar

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी जिल्ह्याकरीता 6009 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.पूर्ण जिल्हातून पंचायत समिती निहाय एकूण 2192 अर्ज सादर झालेले होते, त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश होता. त्यामध्ये जिल्हातून पात्र 2178 लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहे.#chandrapur

ज्या लाभार्थ्यांना घरकूल मंजूर झाले नसेल अशा लाभार्थ्यांनी 'वंदे मातरम चांदा या 1800-233-8691 या टोलफ्री नंबर वर फोन करून आपले संपूर्ण नाव,पूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांक ट्रोलफ्री नंबरवर कळवावे. समाजकल्याण विभागाकडून पात्र लाभार्थी तपासुन पुढील मंजुरी यादीत त्यांचे नाव घेण्यात येईल.#khabarkatta

समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाच्या सर्व योजना पोहोचाव्या आणि प्रत्येकाला मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात हे पं. दीनदयाल उपाध्याय यांचे अंत्योदयाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून जिल्ह्यातील गरजूंना घर देण्यासाठी रमाई आवास योजनेतून मदत करण्याचा निरंतर प्रयास राहील असे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.#khabarkatta

Pages