खबरकट्टा/चंद्रपूर:
घुग्घुस : धरून फिरायला जातो म्हणून सांगून गेलेल्या इसमाचा वर्धा नदी नकोडा घाटात मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.
मृतकाचे नाव ज्ञानेश्वर देवराव चिकणकर (39) रा. बहिरमबाबानगर, घुग्घुस असे आहे. 24 जानेवारीच्या सायंकाळी 5 वाजता दरम्यान ज्ञानेश्वर फिरायला जातो म्हणून वडिलांना सांगून घरून गेला. तो रात्री व दुसऱ्यादिवशीही घरी परत आला नाही.
घरच्या व नातेवाईक मंडळीने शोधा शोध केली. पोलिसात बेपत्ता असल्याची माहिती दिली.दरम्यान शुक्रवारी दुपारी वर्धा नदी नकोडा घाटावर नदीच्या पाण्यात त्याचा मृतदेह तरंगताना दिसून आला. नकोडाचे सरपंच बांदूरकर व मृतकाच्या कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
