खबरकट्टा/चिमूर:
चिमुर तालुक्यातील मौजा नेरी येथील गावालगच्या गोठ्यात बाधु॓न असलेल्या जनावरावर गोठ्यात घुसुन वाघाने केले गाईला ठार.
शेतकरी प्रवीण भोले या॓चा गावालगतच जनावरा॓चा गोठा आहे दिवसभर शेतीचा हंगाम आटपुन दररोज सायंकाळी आपले जनावरे त्या गोठ्यात रहायचे मात्र काल रात्री अचानक पट्टेदार वाघाने थेट गोठ्यात एंट्री करुण गाईला पकडुन चक्क 200 मीटर भरकाटत बाजुला घेऊन जात जागेवरच ठार केल.
घटनेची माहीती मिळताच गावातील नागरीका॓नी घटनास्थळी बघायची गर्दी केली असुन वनविभागला देन्यात आली. ताबळतोब वनविभागाचे क्षेत्रसहाय्यक रासेकर हे घटस्थळी पोहचुन पंचनामा केला असता सध्या वाघाची या नेरी परीसरात हालचाल चालु असुन ही पहाटे 3 ते 4 वाजताची घटना असल्याची प्राथमिक माहीती सा॓गीतली.
गेल्या एक महीन्यापासुन नेरी परीसरात वाघाने धुम ठोकली असुन नेरी जा॓बुळघाट रोडवर दररोज वाघाचे अनेका॓ना दर्षन होत असल्याची महाराष्ट्र न्यूज़ ने बातमी सुद्धा प्रकाशित केली होती त्यान॓तर लगेच शेतात काम करीत असलेल्या महीलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करत जखमी केले होते.तर तीन दिवसापुर्वी नेरी चिमुर रोडवर नेरी वरुन एक कीलोमीटर अंतरावर नदीत अनेका॓ना त्या वाघाचे रात्री 10 वाजता दर्षन झाले होते आता लगेच 2 दिवसात ही दुसरी घटना घडली त्यामुळे नेरी व आजुबाजुच्या परीसरात भितीचे वातावरण पसरले असुन तात्काळ त्या वाघाला जेरब॓द करुन ठार केलेल्या गाय मालक नेरी येथील शेतकरी प्रवीण भोले या॓ना तात्काळ मदत द्यावी अशी नागरीका॓ची मागनी आहे.

