थकित पाणीपट्टी भरा अन्यथा नळ जोडणी बंद. - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



थकित पाणीपट्टी भरा अन्यथा नळ जोडणी बंद.

Share This
मनपाचा अल्टिमेटम: करवसुलीसाठी 12 पथके गठीत

चंद्रपूर 10 जानेवारी - पाणीकराची करवसुली मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने मनपातर्फे करवसुली मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. पाणीपट्टी कर वसुलीसाठी मनपाद्वारे 12 पथके गठीत करण्यात आली असुन यापुढे पाणीपट्टीचा भरणा न करणार्‍या लाभधारकांचे नळ जोडणी बंद करण्यात येणार आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 करीता रू. 12.97 कोटी थकीत मागणी व रू. 05.45 कोटी चालू मागणी अशी एकूण रू. 18.43 कोटी पाणीपट्टी कराची वसुली थकीत आहे. यापुर्वी शहरातील नळधारकांनी थकीत कराचा भरणा करावा यासाठी महानगरपालिकेमार्फत सूट देण्यात आली होती. याअंतर्गत 31 ऑक्टोबर पर्यंत कराचा एकमुस्ता भरणा केल्यास 10 टक्के तर 01/11/2022 ते 31/12/2022 पर्यंत पाणी कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी 5% सुट देण्यात आली होती. 
मोबाईल संदेश, ऑटो संदेश, फोन, सोशल मिडिया इत्यादी विविध माध्यमातुन तसेच प्रत्यक्ष भेटी देऊन कर भरण्याचे आवाहन केले गेले होते. यानंतरही थकबाकीदारांच्या हलगर्जीपणामुळे करवसुली मोठ्या प्रमाणात थकीत आहे. त्यामुळे मनपाचे 51 अधिकारी - कर्मचारी यांची 12 पथके गठीत करण्यात आली असुन थकबाकी वसुली तसेच थकबाकी न भरल्यास नळ जोडणी कपात करण्याची कारवाई केली जाणार आहे.

नळधारकांनी थकीत कराचा भरणा प्रियदर्शिनी चौक पाणी टाकी येथील मनपाचे पाणी पुरवठा कार्यालय, झोन कार्यालय क्रमांक 1- संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स, झोन कार्यालय क्रमांक 2- कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, झोन कार्यालय क्रमांक 3- देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे स्वीकारण्यात येत आहे.

www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर सुद्धा पाणीपट्टी कराचा भरणा करता येणे शक्य आहे. शहरातील नागरिकांनी नळजोडणी बंद होऊ नये यासाठी पाणी कर त्वरित भरण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Pages