लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा येथील चुनाभट्टी वॉर्डात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
चुनाभट्टी वॉर्डात राहणाऱ्या मदन आत्राम (22) व अमित पाल (19) या दोघांनी वॉर्डातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास राजुरा पोलिस करीत आहेत.