मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन.:#sharad-pawar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन.:#sharad-pawar

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आज उर्जानगर वसाहतीत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य, शिक्षण, कला साहित्य व क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात अनमोल कामगिरी असलेल्या मा. शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत अनेकांनी उत्स्फूर्त पणे सहभागी होऊन अभिनव पद्धतीने शुभेच्छा दिल्या.


सदर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी अनुकूल खन्नाडे यांनी केले.

सदर मॅरेथॉन स्पर्धा एकूण वेगवेगळ्या तीन टप्प्यात घेण्यात आली असून चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ भटारकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा उंचावत सदर स्पर्धेची सुरुवात केली.


'अ' गटातून प्रथम पारितोषिक - रितेश मिलमिले, द्वितीय पारितोषिक - प्रेम गुरनुले ,तृतीय पारितोषिक - मनीष धवले, व प्रोत्साहनपर पारितोषिक - लावण्या नायरकर यांना मिळाले.

'ब' गटातून प्रथम पारितोषिक - क्रिश मिस्त्री, द्वितीय पारितोषिक - ऋषिकेश सोनवणे ,तृतीय पारितोषिक - वंश दिवसे, व प्रोत्साहनपर पारितोषिक - तेजस्विनी कांबळे यांना मिळाले.

'क' गटातून प्रथम पारितोषिक - शिवाजी गोस्वामी , द्वितीय पारितोषिक - कृष्णा होडबे ,तृतीय पारितोषिक - आदित्य बीसेन, व प्रोत्साहनपर पारितोषिक - डिम्पल खाडे यांना मिळाले.

सदर स्पर्धेच्या आयोजनात श्री. अभयकुमार मस्के साहेब, श्री.सुधाकर काकडे साहेब, श्री. उत्तम रोकडे साहेब, श्री. जगदीश परडखे साहेब, श्री. अभिजितभाऊ खन्नाडे, श्री. सुजीतभाऊ ऊपरे, श्री. राहुलभाऊ भगत, श्री. रोशनभाऊ फुलझेले, श्री. अंकितजी ढेंगारे ग्रामपंचायत सदस्य विचोडा, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सदर स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता अनुकूल खन्नाडे ग्रामपंचायत सदस्य ऊर्जानगर, पंकजभाऊ ढेंगारे पंचायत समिती सदस्य चंद्रपूर, शुभम आंबोडकर, सौरभ घोरपडे, निशांत निगमपल्लीवार, राज चुनारकर, अमोल पारशिवे, ऋषभ घाटे ,अभिजीत मडावी, यांनी अथक परिश्रम घेतले.

Pages