कंटेनर चालत्या कारवर पलटला : #road-accident - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



कंटेनर चालत्या कारवर पलटला : #road-accident

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : 

बल्लारपूरवरून चंद्रपूरला जात असलेल्या कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लेनमध्ये असलेल्या चालत्या कारवर पलटला. त्यामध्ये कारचालक थोडक्यात बचावला. मात्र, कंटेनरचालक जखमी झाला. त्याला तत्काळ बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.


ही घटना बुधवारी सकाळी ६.३० वाजता विसापूर टोलनाका बल्लारपूर रोडवरील बॉटनिकल गार्डन लगतच्या दर्ग्याजवळ घडली. दर्ग्याजवळील महामार्गाने एक कंटेनर (एमएच ४९ एटी ६६५६) पेपरचे पार्सल घेऊन बल्लारपूर चंद्रपूरकडे जात होता. दरम्यान, कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वळण रस्त्यावर तो पलटी होऊन लगतच्या दुसऱ्या रोडच्या लेनमध्ये चालत्या कारवर आदळला. त्यामध्ये कारचालक थोडक्यात बचावला व या अपघातात कंटेनरचालक गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी जाऊन कंटेनरचालकाला तत्काळ बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलवले व वाहतूक पोलिसांच्या मदतीने कंटेनरला महामार्गावरून काढून वाहतूक सुरळीत केली.

Pages