नायलॉन मांजामुळे कापला प्राध्यापकाचा गळा #Professor's-throat-cut-by-nylon-thrade - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



नायलॉन मांजामुळे कापला प्राध्यापकाचा गळा #Professor's-throat-cut-by-nylon-thrade

Share This
खबरकट्टा :नागपूर :न्यूज डेस्क -

नागपूमध्ये पुन्हा एक दुचाकीस्वार नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. गळ्यात नायलॉन मांजा अडकल्यामुळे प्राध्यापकाचा जीव जाता-जाता वाचला.

डॉ. राजेश क्षीरसागर असे जखमी झालेल्या प्राध्यपकांचे नाव आहे. डॉ. राजेश क्षीरसागर हे आपल्या दुचाकीवरून उड्डाणपुलावर जात असताना त्यांच्या गळ्यात मांजा अडकला. यात क्षीरसागर यांच्या गळ्याला आणि उजव्या हाताच्या दोन बोटांना गंभीर दुखापत झाली आहे.


डॉ. क्षीरसागर हे कामानिमित्त कळमेश्ववरून परत येत असताना उड्डाण पुलावर गळ्याला काहीतरी अडकल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी तत्काळ गाडी थांबवली.


गाडी थांबवण्यापूर्वी त्यांनी गळ्यावर असलेला नायलॉन मांजा हाताने बाजूला केला. परंतु, मांजाने त्यांच्या उजव्या हाताचे मधले बोट आणि अंगठा कापला. क्षीरसागर यांच्या गळ्यावरही मांजामुळे दुखापत झाली आहे.


या घटनेनंतर क्षीरसागर यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा अपघात नसून हा जीवघेणा हल्ला आहे, यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Pages