13 डिसेंम्बर पासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आज 21 डिसेंम्बरला बामणी येथील प्रोटीन्स फेक्ट्रि च्या मागील बाजूस सडलेल्या व हाडांचा सांगाळा अवस्थेत मिळाल्याने बामणी परिसरात एकच खळबळ उडाली.
शिवशक्ती नगर बामणी निवासी 34 वर्षीय चंदन महादेव नारनवरे युवक हा मागील 13 डिसेम्बरपासून बेपत्ता होता, त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते मात्र चंदन चा काही थांगपत्ता लागला नाही.
झाडी झुडपात चंदन चा मृतदेह कसा गेला? यावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, मागील काही दिवसांपूर्वी पोम्भूर्णा येथे सकाळी फिरायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले होते, चंदन वर ही वाघ किंवा बिबट्याने हल्ला केला असावा असा अंदाज लावण्यात येत आहे.
याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश थिपे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यावर पूर्ण तपशील मिळणार, चंदन चा मृत्यू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाला की नाही, सध्या शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. चंदन बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी 15 डिसेंम्बरला बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती.