जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एन एस एस तर्फे मार्गदर्शन शिबीर:#nss - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एन एस एस तर्फे मार्गदर्शन शिबीर:#nss

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर : राजुरा:



राजुरा येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक व संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिवस व एड्स सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये एड्स बद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील एड्स विभागातील समुपदेशक पल्लवी पिपरीकर व लॅब टेक्निशियन रश्मी बोरकर यांनी उपस्थित राहून एड्स कोणत्या मार्गाने पसरतो, प्रतिबंधासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या, आणि जर एड्स चे निदान झाले तर काय काळजी घ्यावी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजेंद्र मुद्दमवार, प्रा. विठ्ठल आत्राम, डॉ. सारीका साबळे, एन एस एस चे कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी, व संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थेच्या ज्योत्स्ना उराडे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.


Pages