अखेर बावणे पिता-पुत्र अटकेत : नगरपंचायत प्रभाग क्र.३ काँग्रेसचे उमेदवार नितीन बावणे ...!!!#nagar-panchayat-election - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अखेर बावणे पिता-पुत्र अटकेत : नगरपंचायत प्रभाग क्र.३ काँग्रेसचे उमेदवार नितीन बावणे ...!!!#nagar-panchayat-election

Share This

*बिग ब्रेकिंग



कोरपना नगरपंचायत प्रभाग क्र.३ काँग्रेसचे उमेदवार नितीन बावणे व काँग्रेस नेते विजय बावणे यांना अटक...!!!


 नगर पंचायत रनसंग्राम : कोरपण्यात काँग्रेस नेते बावने विरुद्ध गुन्हा दाखल -भाजप निवडणूक प्रभारी डाहुलेंच्या वाहणावर दगडफेक 

कोरपना नगर पंचायतीच्या ऐन निवडूकीच्या आदल्या रात्री प्रतिस्पर्धी पक्षावर दगडफेकीसारखे कृत्य करून काँग्रेस ने भाजप ला सर्वसामान्य जनतेतून वाढणाऱ्या प्रतिसादाचा धसका तर घेतला नाही ना अशी चर्चा मतदा्रांमध्ये सूरू असतानाच सर्वपक्षीय कार्यकर्ते व सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढान्यास भाजप नेहमीच अग्रेसर असून भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बावणे यांना तात्काळ अटक करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा प्रशासनाला इशारा दिला आहे.

खबरकट्टा /चंद्रपूर:कोरपना:-

कोरपना नगरपंचायतची रणधुमाळी सुरू असून आज 21 डिसेंबर ला मतदान होत आहे. या निवडणूकीत भाजपा, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शिवसेना मित्र पक्षाकडून शहर परिवर्तन आघाडी विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस थेट लढत आहे.


यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा महामंत्री नामदेव डाहूले यांची कोरपना नगरपंचायत निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आज शहरात मतदान असताना काँग्रेस कार्यकर्त्यांना पराभव दिसत असताना काल रात्री शहरात काँग्रेस नेते विजय बावणे व नितीन बावणे व इतर कार्यकर्त्यांनी नामदेव डाहुले यांच्या गाडीवर दगडफेक करून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनोवृत्तीचे दर्शन कोरपना शहरातील नागरिकांना दिसून आले आहे.


तसेच भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षातर्फे कोरपना पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपी विरुद्ध कलम कलम १४३, १४७, ३२३, ३४१, ४४७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परंतू अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करून कार्यवाही ठरावी अशी मागणी कोरपना शहरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.



Pages