*निर्दयी बाप : 3वर्षीय मुलाला विष पाजून मारण्याचा प्रयत्न :वाचा सविस्तर* #Attempt-to-poison-3-year-old-boy-by-father - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



*निर्दयी बाप : 3वर्षीय मुलाला विष पाजून मारण्याचा प्रयत्न :वाचा सविस्तर* #Attempt-to-poison-3-year-old-boy-by-father

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :गोंडपिपरी -

गडचिरोली शहरातील गोकुल नगर या ठिकाणी एक संशय ग्रस्त व्यक्तीने आपल्या च मुलाला विष पाजून जिवे मारण्याचे प्रयत्न करणारी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात शनिवार 18/12/2021रोजी घडली आहे.घरातील वादविवाद झाले तरी वडीलाने निर्दयी, निष्ठुर पने आपल्या एकुलत्या एक मुलाला विष देऊन मारण्याचे प्रयत्न केल्यामुळे गडचिरोली शहर पार हादरून गेलेले आहे.


या घटनेची थोडी हकीकत वाचकांसमोर येणे गरजेचे असून एखादा मनुष्य आपल्या मनात संशय ठेवून एक मोठा घातकी निर्णय कसा घेतो याचा विचार करण्याची गरज आहे.


आपल्याच पोटच्या तीन वर्षीय मुलाला विष पाजण्यात पाजणाऱ्या या निर्दयी व्यक्तीचे नाव प्रशांत जनार्दन पवार वय 35 वर्ष असून मुक्काम पोस्ट आडगाव तालुका गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर येथे राहणारा आहे.28 मार्च 2016 रोजी गडचिरोली सामान्य रुग्णालयात कार्यरत कर्मचारी मधुकर पाटील वारक-यांची महिला रुग्णालयात कार्यरत मोठी मुलगी जयमाला लाटीलवर हीच्यासोबत प्रशांत याचे लग्न झाले होते.


एक दीड वर्षाचा कालावधी झाल्यानंतर प्रशांत व जयमाला या दाम्पत्याला एक गोंडस मुलाच्या रुपात पुत्र रत्नाची प्राप्ती झाली.अशा प्रकारे आपल्या सुखी आनंदी आयुष्य दोघेही सुखरूप घालवत होते.जयमाला आणि प्रशांत यांचा सुखी संसाराचा गाडा सुरळीत सुरु असताना अचानक एक दिवस प्रशांत आपल्या प्रेमिके सोबत पळून जाउन तीन चार महिन्यापर्यंत आपल्या घराकडे दुर्लक्ष करीत मदमस्त होऊन प्रेमिकेसोबत वेळ घालवत होता.


महिला रुग्णालयातील नौकरी करणारी मुलगी व लहान नातू यांची योग्य देखरेख व्हावी या करीता प्रशांत ला समज देऊन गडचिरोली येथे येऊन राहण्यास राजी केले होते.सासुर वाडीत येऊन राहणाऱ्या प्रशांत ने पुन्हा काहीतरी नवीन संशय मनात निर्माण करत, पत्नी व सासू सासरे यांचेशी वाद विवाद करू लागला होता.


वारंवार मनात संशयाचे भूत सवार झाल्याने आपल्या पत्नीवर संशय घेणे, पत्नीसोबत झगडा भांडण करत राहण्याची सवय काही प्रशांत सोडायला तयार नव्हता, म्हणून जयमाला ने कौटुंबिक समुपदेशक केंद्राची मदत घेऊन, आपल्या पतीला समजावत, आपण वेगळे घर घेऊन राहू असे सांगून गोकुळ नगर येथे एका किरायाच्या घरात राहण्यास गेले.


काही दिवस सुरळीत घर संसार सुरू असताना पुन्हा 2019/2020 मध्ये प्रशांतने आपल्या पत्नी, व मुलाला सोडून घरातून निघून जाण्याचे कृत्य पुन्हा केले.आपला नवरा वारंवार घर सोडून जातो, या कारणाने त्रस्त होऊन,तसेच रुग्णालयातील कामात अडथळा, व लहान बाळाकडे घरच्या लोकांची देखरेख व्हावी यासाठी आपल्या मुलाला घेऊन जयमाला पुन्हा आई वडीलांच्या घरी राहण्यास आली. आई वडीलांच्या घरी येऊन तीन महिन्याचा कालावधी होताच प्रशांत पुन्हा आपल्या सासुरवाडीत येऊन राहायला लागला.


दिनांक 18/12/2021 रोजी सकाळी 8वाजेच्या सुमारास पत्नी जयमाला ला महिला रुग्णालयात सोडून दिल्यानंतर 9ते 9.30 च्या दरम्यान घरी येऊन मुलाला फिरवून आणतो असे आपल्या सासूला सांगून आपल्या 3वर्षाच्या मुलाला घेऊन घराच्या बाहेर पडला,परंतु वारंवार डोक्यात शिरलेला संशयाचा भूत हा प्रशांत ला सोडत नव्हता.मुलाला फिरवण्यास नेतो म्हणून गेलेला प्रशांत उशिरा पर्यंत घरी न आल्याने, घरच्या लोकांनी प्रशांत च्या मोबाईल वर संपर्क करीत होते.


अखेर एक वाजेच्या सुमारास प्रशांत आपल्या मुलाला विष दिल्या अवस्थेत सासूच्या दारातच सोडून न सांगता निघून गेला.जयमाला च्या आई ने आपल्या नातवाला जेवण देण्याचे प्रयत्न केले असता, नातवाने पोटात दुखत असल्याचे दिसून आले व अचानक बेशुध्द होऊन खाली कोसळला.लगेच नातवाची प्रकृती बिघडल्याने सासूने प्रशांतला संपर्क करून मुलाला उपचाराकरिता दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले.


महिला रुग्णालयात व्यस्त असताना मुलाची प्रकृती बिघडल्यानचे निरोप मिळताच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुमती घेऊन जयमाला सोनोग्राफी सेंटर येथे पोहचली.गडबडीत सोनोग्राफी सेंटर कडे येत असताना आपला पर्स महिला रुग्णालयात विसरल्याचे लक्षात आले असता प्रशांत ला पर्स आणावयास सांगितले असता, पुन्हा प्रशांत आपला मोबाईल बंद करून पसार झाला होता.


मुलाची प्रकृती गंभीर होत असल्याने सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांनी एम आर आय रिपोर्ट काढण्यास चंद्रपूर येथे घेऊन जाण्यास सांगितले.दुपारी अडीच वाजता आपल्या भावाच्या मदतीने जयमाला आपल्या मुलाला उपचार करण्याकरिता चंद्रपूर जाण्यासाठी निघाली असता,वाटेतच मुलाच्या तोंडातून फेस निघत असल्याने प्रशांत ला संपर्क करण्याचे प्रयत्न केले असता प्रशांत चे मोबाईल बंदच असल्याचे आढळून आले होते.


कशीबशी जयमाला आपल्या मुलाला चंद्रपूर येथील जटपूरा गेट परिसरातील डॉ. मावानी यांचे कडे दाखल केले होते.मुलाची प्रकृती गंभीर स्वरूपाची दिसून आल्याने डॉ. मावानी यांनी मुलावर विष प्रयोग झालेले आहे असे सांगून ताबडतोब उपचार सुरू केले होते.


इकडे मोबाईल बंद करून पळालेल्या प्रशांत च्या मोबाईल वरून एका अनोळखी व्यक्तीने फोन करून प्रशांत आरमोरी रोड वर बेशुध्द पडून असल्याचे सांगितले.अशा संकटकाळी आपल्या मुलाचे उपचार करीत असलेल्या जयमालाने अनोळखी व्यक्तीला विनंती करून प्रशांत शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करा व मुलाला कोणते विष पाजले आहे असे विचारण्यास सांगितले.त्या अनोळख्या व्यक्तीने प्रशांतला शुध्दीवर आणून विचारले असता, प्रशांत ने आपल्या खिशातून शिंबुस नावाच्या कीटनाशक ची बॉटल दाखवून मुलाला ज्यूस मधून विष पाजले व स्वतः सुध्दा विष पेल्याचे कबूल केले होते.स्वतः च्या मुलाला विष आत्महत्या करणाऱ्या प्रशांतला पोलिसांच्या मदतीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु अचानक प्रकृती बिघडल्याने त्यालासुद्धा पुढील उपचारासाठी चंद्रपूर मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जयमालाची विचारपूस केली असता डॉ. मावानी यांचेकडे योग्य उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे.पण विष प्रयोग करणाऱ्या या निर्दयी प्रशांत ची प्रकृती कशी आहे हे बातमी लीहेपर्यंत मिळाले नव्हते.

Pages