खबरकट्टा / चंद्रपूर:-
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई या संस्थेच्या वतीने अक्षरमंच काव्यलेखन समूहात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत सलग एक वर्ष सहभाग घेऊन स्वरचित उत्तम साहित्य सादर केले. या साहित्याची दखल घेत साहित्य संपन्न जीवनाची उल्लेखनिय यशस्वी वाटचाल समाजाभिमुख गुणवत्तेच्या सन्मानार्थ
जागतिक कीर्तीचे जेष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर सर , ह. भ. प. श्री. शिवाजी किसन खैरे सर अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई या संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष यांच्या हस्ते
अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२१ कवी. मधुकर श्रावण दुफारे ऊर्जानगर चंद्रपूर यांना लोकमान्यतेची साहित्य गौरवमुद्रा,सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.सदर गुणगौरव समारंभ पुण्याई सभागृह पौड रोड, पुणे येथे घेण्यात आला.लोकमान्यतेची साहित्यगौरवमुद्रा आपल्या कर्तृत्वावर उमटल्याचा आम्हास विशेष आनंद होत आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल
श्री गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगरचे अध्यक्ष मुरलीधर गोहने, सचिव विलास उगे, कोषाध्यक्ष देवराव कोंडेकर, सेवाधिकारी शंकरजी दरेकर, कवी खेमदेव कन्नमवार, दिगांबर इंगळे, जयंत देठे साहेब, सुधाकर काळे, अमीत उदावंत साहेब, विलास गणफाडे, वामन वांढरे, बांदूरकर, गुटे साहेब, छोटू घायवान यांचेसह मित्र परिवार सर्वांनी पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.