🍾 *जिल्ह्यात तीन दिवस दारूबंदी : वाचा सविस्तर #liquer-ban - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



🍾 *जिल्ह्यात तीन दिवस दारूबंदी : वाचा सविस्तर #liquer-ban

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :


चंद्रपूर जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतीमध्ये 21 डिसेंबर रोजी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणूक असलेल्या क्षेत्रात मतदानाचे दिवशी कोरडा दिवस म्हणून जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) अन्वये तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येत असून या कालावधीत कोरडा दिवस पाळण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.


सावली,पोंभूर्णा,गोंडपिंपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही या नगरपंचायतीचा व नागभीड नगरपरिषद पोटनिवडणुकीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने मंगळवार दि. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान व बुधवार दि. 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या मतदान व मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक व नागभीड नगरपरिषदेच्या पोटनिवडणूकीकरीता मतदान व मतमोजणी निमित्त येथील सर्व किरकोळ विक्री अनुज्ञप्त्या, सर्व मद्य, बिअर, ताडी विक्री करिता बंद राहतील.


नगरपरिषद नागभीड तर नगरपंचायत सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत हद्दीतील तसेच, गोंडपिपरी, वरोरा, बल्लारपूर, कोरपना, चिमूर, भद्रावती, राजुरा, मुल, ब्रह्मपुरी, जिवती व नागभीड या तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मद्य, बिअर तसेच ताडी विक्री अनुज्ञप्त्या सोमवार दि. 20 डिसेंबर ते बुधवार दि. 22 डिसेंबर 2021 या तिन्ही दिवसाच्या कालावधीत बंद राहतील.


या आदेशाच्या नियमातील तरतुदीचा जे अनुज्ञप्तीधारक भंग करतील त्यांच्याविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

तालुकानिहाय निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींची यादी :

गोंडपिपरी तालुक्यातील परसोडी, कुडेसावली व विहीरगांव, वरोरा तालुक्यातील सोनेगाव, बोरगाव मो., खापरी, बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली, कोरपना तालुक्यातील अंतरगाव, चिमूर तालुक्यातील पिंपळगाव, येरखेडा, भद्रावती तालुक्यातील बिजोनी, राजुरा तालुक्यातील रामपूर, सिंधी, सुमठाणा, विरुर स्टेशन व सास्ती, मूल तालुक्यातील चिरोली, ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी, कोसंबी खडसमारा, खरकाडा व मेंडकी, जिवती तालुक्यातील लांबोरी व नंदप्पा, नागभीड तालुक्यातील येनोली माल, कोथुळना व सोनोली बुज या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे.

Pages