📣 विशेष सूचना : अनुकंपा धारक लक्ष दया : 21 डिसेंबर, 2021 रोजीच्या अनुकंपा मार्गदर्शन / बैठक :अनुकंपा नियुक्ती पदभरतीची प्रक्रीया दिनांक 31 डिसेंबर, 2021 पर्यंत पार पाडावयाचे शासनाचे आदेश #अनुकंपा धारक - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



📣 विशेष सूचना : अनुकंपा धारक लक्ष दया : 21 डिसेंबर, 2021 रोजीच्या अनुकंपा मार्गदर्शन / बैठक :अनुकंपा नियुक्ती पदभरतीची प्रक्रीया दिनांक 31 डिसेंबर, 2021 पर्यंत पार पाडावयाचे शासनाचे आदेश #अनुकंपा धारक

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : विशेष सूचना :

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय क्रमांक अकंपा-1219/प्र.क्र. 56/आठ दिनांक 11.09.2019. 2. मा. विभागीय आयुक्त, नागपुर विभाग नागपुर यांचे पत्र क्र. मशा-6 (5) / सीआर-20/कावि-449/2021 यांच्या पत्र संदर्भानुसार गट-क व गट-ड मधील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 20 % पदे अनुकंपा नियुक्तीद्वारे भरण्यात यावीत, असे नमुद असुन सदरची मर्यादा ही सन 2019 या कॅलेंडर वर्षापासून तीन वर्षांसाठी दिनांक 1 जानेवारी, 2019 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंत अंमलात आहे.


मा. अपर मुख्य सचिव (सेवा) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनांक 10 डिसेंबर, 2021 रोजी झालेल्या (व्हि.सी) बैठकिचे अनुषंगाने त्यांनी दिनांक 31 डिसेंबर, 2021 पर्यंत अनुकंपा नियुक्तीद्वारे पदभरतीची प्रक्रिया पार पाडण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार अनुकंपा नियुक्ती पदभरतीची प्रक्रीया दिनांक 31 डिसेंबर, 2021 पर्यंत पार पाडावयाची असल्याने त्यासंबधाने दिनांक 21 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 12:00 वाजता मा. जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांचे अध्यक्षतेखाली अनुकंपा मार्गदर्शन / बैठक आयोजित आहे. सदर नियोजित असलेल्या बैठकिस अनुकंपा धारक उमेदवारांनी आपल्या स्तरावरुन / आवश्यक माहितीसह आपले मार्फत उपस्थित राहणेबाबतचे पत्र / सुचना चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिलेल्या आहेत.


अनुकंपा मार्गदर्शन / बैठकिचे स्थळ- प्रियदर्शिनी इंदिरा गांधी, सांस्कृतीक सभागृह चंद्रपुर

Pages