डॉ. प्रशांत बोकारे यांची गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती:#dr.prashant-bokare - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



डॉ. प्रशांत बोकारे यांची गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती:#dr.prashant-bokare

Share This

 खबरकट्टा /चंद्रपूर :


डॉ. प्रशांत श्रीधर बोकारे यांची गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी सध्या ओ. पी. जिंदाल विद्यापीठ, रायगड, छत्तीसगड येथील स्कुल ऑफ इंजिनीअरिंग येथे प्राध्यापक व अधिष्ठाता असलेल्या डॉ प्रशांत बोकारे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ प्रशांत बोकारे यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.

दि.7 सप्टेंबर 2020 रोजी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ प्रशांत बोकारे यांनी सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथून स्थापत्य अभियांत्रिकी ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील व्हीआरसीई येथून एम. ई. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली व आयआयटी गुवाहाटी येथून पीएच.डी. प्राप्त केली. त्यांना अध्यापन व संशोधनाचा व्यापक अनुभव आहे.

डॉ बोकारे यांनी बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय सेवाग्राम वर्धा येथे तसेच रुंगटा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे प्राध्यापक व प्राचार्य पदावर काम केले आहे.

कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी अलाहाबाद उच्च न्यायालय येथील सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति गठित केली होती. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर येथील संचालक प्रा. हिमांशू राय व शासनाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता या समितीचे सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. प्रशांत बोकारे यांची कुलगुरुपदी नियुक्ती जाहीर केली.

Pages