9 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम
खबरकट्टा /चंद्रपूर : राजुरा -
राजुरा तालुक्यातील चुनाळा सारख्या लहानशा गावात परिसरातील भक्तजनांच्या सहकार्याने श्री तिरूपती बालाजी च्या मंदिराची स्थापना करून सोळा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य सोळाव्या ब्रम्होत्सव सोहळयाचे आयोजन 9 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत करण्यात आले असून यात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री तिरूपती बालाजी देवस्थानात ब्रम्होत्सव सोहळा व नौसर्गिक संकटापासून रक्षण, मनशांती, विश्वशांती आणि प्राणिमात्रांच्या कल्याणाकरीता अष्टोत्तर शत (108) कलश अभिषेक, श्री बालाजी कल्याणोत्सव व श्री पुष्प यज्ञ तसेच सुदर्शन महायज्ञ आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील प्रसिद्ध श्री शास्त्रपूर्ण पराशराम विखनासचार्युलू महाराज सुपूत्र पट्टाभिरामाचार्यालू महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. या ब्रम्होत्सवाअंतर्गत परिसरातील गरजू अंध रूग्णांना उपचार होऊन दृष्टी लाभावी याकरीता देवस्थानाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मेडीकल कॉलेज सेवाग्राम यांच्या सहकार्याने विनामूल्य मोतिबिंदू डोळे तपासणी व कृत्रीम मोतिबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबीरा चे आयोजन रविवार दि. 12 डिसेंबर ला सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे
ब्रम्होत्सवाची सुरूवात गुरूवार दि. 9 डिसेंबर ला सकाळी 8 वाजता ग्रामसफाई व जनजागृती दिंडी ने होईल तर सकाळी 10 वाजता रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीर, रात्रौ 8 वाजंता ध्वजारोहणम नवग्रहपूजा, तर सायं. 8.30 वाजता दत्तगुरू पदावली भजन मंडळ यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.
शुक्रवार दि. 10 डिसेंबर ला सकाळी 8 वाजता भगवान बालाजी पंचामृत अभिषेक, अग्नीप्रतिष्ठा, सायं. 5 वाजता वधुवरनिर्णयम (साक्षगंध), रात्रौ 7 वाजता चुनाळा येथील शालेय विद्याथ्र्यांचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 11 डिसेंंबर ला सकाळी 8 वाजता नवग्रह पूजा, सकाळी 11 वाजता श्रीनिवास कल्याणम (श्री बालाजी विवाह सोहळा) दुपारी 2.00 वाजता देवस्थानाला विशेष योगदान देणाज्या या वर्षातील देणगीदात्यांचा सत्कार, दुपारी 2.30 वाजता श्री बालाजी, श्री लक्ष्मीदेवी, श्री भुदेवी च्या उत्सव मुर्तींची 108 कलशासह भव्य शोभायात्रा, सायं. 6 वाजता लक्ष्मीनारायण हवन, रात्रो 8.30 वा श्री जय गुरूदेव भजन मंडळ व श्री लक्ष्मी माता भजन मंडळ रामपूर यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 12 डिसेंबर ला सकाळी 7 वाजता अवभृधोत्सवम्, चक्रस्नानम्, पूर्णाहूती. सकाळी 10 वा विनामूल्य मोतिबिंदू डोळे तपासणी व कृत्रीम मोतिबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबीराचा उद्घाटन सोहळा, तसेच सकाळी 11 वाजता मोर्शी जि. अमरावती येथील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. लक्ष्मणदास काळे महाराज यांचे गोपालकाल्याचे किर्तन, दुपारी 1 वाजता चुनाळा येथील सासरी गेलेल्या सर्व मुलींचा जावयासह सत्कार समारंभ व दुपारी 1 वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
चार दिवस चालणाऱ्या ब्रम्होत्सव सोहळया अंतर्गत आयोजित सपूर्ण सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री तिरूपती बालाजी देवस्थान चुनाळा चे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, उपाध्यक्ष प्रकाश कोठारी, सचिव वाय. राधाकृष्ण, सदस्य शामबाबु पुगलीया, सुरेश सारडा, शंकरराव पेद्दुरवार, अशोक शहा, गोरखनाथ शुंभ, मनोज पावडे सह ब्रम्होत्सव उत्सव समिती च्या वतीने करण्यात आले आहे.