तुम्ही काही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण पुढील तीन दिवस बँका बंद राहणार आहेत, म्हणजे त्यात कोणतेही काम होणार नाही. देशभरातील सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी 16,17 डिसेंबर ला दोन दिवसांचा संप पुकारला आहे. यासह साप्ताहिक सुट्टीमुळे रविवारी बँका बंद राहतील.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने याबाबत माहिती दिली आहे. सरकारच्या खासगीकरणाच्या सुरू असलेल्या तयारीला विरोध करण्यासाठी UFBU ने संपाची घोषणा केली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स अंतर्गत बँकांच्या नऊ युनियन आहेत.
या संपामुळे जनतेचे मोठे नुकसान होणार आहे. बँक कर्मचाऱ्यांना बँक व्यवस्थापनाकडून संपावर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँक कर्मचारी यूनियनने मात्र संपाची भूमिका कायम ठेवली आह.
स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाने कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या हितासाठी संपावर न जाण्याचे आवाहन केले आहे. माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार बँकांचे प्रमुख, बँक असोसिएशन आणि बँक कर्मचारी यूनियन यांच्यात चर्चा सुरु आहे.
बँक व्यवस्थापन सातत्याने संप रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 2021 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात बनवलेल्या कमिटीसंदर्भात बोलताना दोन बँकांचे खासगीकरण करणार असल्याचे म्हटले होते. कोणत्या बँकांचे खासगीकरण करायचे यासंदर्भातील निर्णय देखील बँक खासगीकरण समिती घेणार आहे.