शिंदोला एसीसी खान व्यवस्थापन व ट्रान्सपोर्ट कंपनी कडून वाहकांची आर्थिक लुट.:#wani - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शिंदोला एसीसी खान व्यवस्थापन व ट्रान्सपोर्ट कंपनी कडून वाहकांची आर्थिक लुट.:#wani

Share This


मागण्या मान्य न केल्यास उपोषणाचा इशारा..

खबरकट्टा /यवतमाळ :वणी


तालुक्यातील शिंदोला, गोवारी गावातील व परिसरातील गेल्या २० वर्षापसून चालक म्हणून भूमिपुत्र काम करीत आहे. अनेक ट्रान्सपोर्ट कम्पन्या आपल्या कम्पनीमध्ये सिमेंटच्या दगडाचे गोवारी ते शिदोला क्रेशर पर्यंत ट्रान्सपोर्ट चे काम करीत आहे व नियमित कायदेशीर वेतन PF व दिवाळीचे वेतन चालक कामगारांना देत होते, परंतु गेल्या १ वर्षापसून चालक कामगारांना तुटपुंजे वेतन देत आहे. PF पासून सुद्धा वंचित ठेवत आहे व दिवाळीचे कायदेशीर बोनस सुध्दा देण्यात आला नाही तरी या बेकायदेशीरपणे चालकांची आर्थिक गळचेपी करून मानसिक दबाव टाकणाऱ्या मायनेक्स ट्रान्सपोर्ट कम्पनी, CCR ट्रान्सपोर्ट कम्पनी, इनलैंड ट्रान्सपोर्ट कम्पनी, CRD ट्रान्सपोर्ट कम्पनी या सर्व ट्रान्सपोर्ट मालकावरती आपले कंपनी मार्फत कारवाई करून खालील गंभीर समस्या सोडविण्यात यावी, याकरिता निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.


यावेळी चालक भूमिपुत्र कामगारांना २६ दिवस रोजगार मिळण्यात यावा, चालक कामगारांचा कायदेशीर PF काढण्यात यावा, कायदेशीर दिवाळीचे बोनस चालक कामगारांना देण्यात यावे, मिनिमम वेजेस अकर नुसार चालक कामगारांना वेतन मिळण्यात यावे, एसीसी सिमेंट कंपनी व ट्रान्सपोर्ट कंपनी मध्ये झालेल्या करारनाम्याची प्रत मिळण्यात यावी, ईत्यादी गंभीर समस्या ७ दिवसाच्या आत न सोडविल्यास आपल्या कम्पनीचे सम्पूर्ण उत्खनन बंद पाडून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल असा ईशारा खान व्यवस्थापक एसीसी शिंदोला माइंस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे शिवसेना नेते संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य वाहकांनी दिला आहे.

Pages