:- दुचाकी स्वारांचा घटनास्थळी दोघांचा मृत्यू. ...
:- ब्रम्हपुरी मार्गावरील सायगाठा जवळील घटना....
खबरकट्टा /चंद्रपूर : ब्रम्हपुरी:-
भरधाव वेगात असलेल्या दुचाकी वाहनांची समोरासमोर जब्बर धडक दिल्याने दोन्ही दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला. दि. २२ नोव्हेंबर ला रात्रीच्या आठ वाजताच्या सुमारास घटना घडली. यामध्ये कमलेश इंदुरकर वय २५ रा. नेरी तालुका चिमुर व रविद्र विठोबा झरकर वय ४० वर्षे रा. पारडी तालुका नागभीड अशी मृतांचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मुत्युदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आले. प्राथमिक तपास उप पोलिस निरीक्षक प्रमोद उंदीरवाडे, पो. शि. जनंबधु यांनी केले.