खबरकट्टा /चंद्रपूर :
महाराष्ट्र् प्रदेश काॅंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पदी चंद्रपुर येथील काॅंग्रेसचे ओबीसी नेते उमाकांत धांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष तथा छत्तीसगढ चे गृहमंत्री ना. ताम्रध्वज साहु यांचे मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र् प्रदेश काॅंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांचे नेतृत्वात ओबीसी विभागाची कार्यकारीणी गठीत करण्यात आली असुन धांडे यांची नव्या कार्यकारीणीत प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापुर्वी ते प्रदेश सरचिटणीस पदावर कार्यरत होते. यासोबतच चंद्रपुर जिल्हा काॅंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष पदी नंदकिशोर वाढई यांची तर चंद्रपुर शहर जिल्हा अध्यक्षपदी प्राचार्य नरेंद्र बोबडे बोबडे यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.