भास्कर चा मदतीला धाऊन आली माणुसकी:#ganesh-gedekar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



भास्कर चा मदतीला धाऊन आली माणुसकी:#ganesh-gedekar

Share This


खबरकट्टा /चंद्रपूर :


दानववाडी महाकाली मंदिराजवळ चंद्रपूर येथे राहणारे भास्कर सातपुते आणि त्यांची पत्नी हे दोघेही अपंग असून आपल्या तीनचाकी सायकलवर अगरबत्ती व धूप विकून आपल्या पोटाची खडगी भरते. दि.१५/११/२०२१ ला पहाटे ५ चा दरम्यान काही अज्ञात समाजकंटकांनी भास्करची तीनचाकी सायकल जाळून टाकली यामुळे त्यांचावर उपासमारीची पाडी आल्याचे वृत्त दी.१६/११/२०२१ ला प्रकाशित झाले.याचा आधार घेत जलसंपदा विभागात कार्यरत गणेश गेडेकर वरिष्ठ लिपिक हे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असतात.

त्यांनी ही बाब आपल्या कार्यालयीन मित्रांना व काही सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितले.त्यांचा शब्दाला मान ठेऊन व सामाजिक आपलुकीचा भावनेतून पुनम जीवतोडे उपविभागीय अभियंता,अखिल चीडे,स्वाती कुळसंगे सहायक अभियंता श्रेणी-२,बाळू अ पार्ट ऑफ लविंग युनिट चे अमित महाजनवार विस्तार अधिकारी, अमृता महाजनवार, मंगेश पाचभाई, अक्षय दहीलकर सामाजिक कार्यकर्ते, सिध्देश्वर दंडीकवार,विलास नांदे, आशिष रंगारी कनिष्ठ लिपिक यांनी पुढाकार घेऊन भास्करची तीनचाकी सायकल दुरुस्तीचा खर्च व घरगुती किराणा व आवश्यक साहित्य भेट देऊन सामाजिक जाणिवेचा प्रत्यय दिला.

Pages