खबरकट्टा /चंद्रपूर :
केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील करोडो लोकांसाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू केले आहे. याचा फायदा तुकूम प्रभागातील जास्तीत जास्त असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना मिळावा यासाठी भाजपचे महानगर महामंत्री तथा तुकूम प्रभागाचे नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या माध्यमातून आज तुकूम प्रभागातील वैद्य नगर येथे श्रमिक कार्ड योजनेचा कॅम्प लावून असंघटित क्षेत्रात कामकरणाऱ्या नागरिकांना सहज रीत्या श्रमिक कार्ड काढून देण्यात आले. व श्रमिक कार्ड चे वितरण नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या हस्ते करण्यात आले.