अबब! महिलेच्या पोटात 15 किलो 900 ग्राम मांसाचा गोळा :मावटकार हॉस्पिटलमध्येमहिलेला जीवनदान #manwatkar-hospital - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अबब! महिलेच्या पोटात 15 किलो 900 ग्राम मांसाचा गोळा :मावटकार हॉस्पिटलमध्येमहिलेला जीवनदान #manwatkar-hospital

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
सात वर्षांपासून पोटात १५ किलो ९०० ग्रॅम वजनाचा मांस गोळा घेऊन आला दिवस पुढे ढकलणाऱ्या एका महिलेवर चंद्रपूरमधील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवनदान दिले. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला पाच बाटल्या रक्त द्यावे लागले. सध्या प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

एका महिला रुग्णाचे पोट वाढत होते. पण काही त्रास नसल्यामुळे कुटुंबाने विशेष लक्ष दिले नाही. तिचे पती पोलीस विभागातून निवृत्त झाले होते. मुले नोकरीवर. मात्र, तिला दवाखान्याबद्दल प्रचंड भीती! त्यामुळे दवाखान्यात कसे न्यावे, हा प्रश्न कुटुंबाला छळत होता. दरम्यान, अचानक पोटात दुखायला लागल्यामुळे ती बेचैन झाली. रविवारचा दिवस होता. मानवटकर हॉस्पिटलमध्ये मोफत शिबिर सुरू होते. अचानक एक वयोवृद्ध स्त्री अपघात विभागात आली. त्यांची नाडी लागत नव्हती व रक्तदाब कमी होता. महिला सरळ झोपू शकत नव्हती.

कुटुंबाने अखेर त्यांना मानवटकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची नाजूक प्रकृती पाहून डॉक्टरांनी सुरुवातीला उपचार करण्यास नकार दिला. सोनोग्राफी व सीटी स्कॅन केला. इतर रुग्णालयातून नकार मिळाल्याने तुमच्याकडे आलो, असे कुटुंबीयांनी सांगताच त्यांना तत्काळ अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले.


🔰 मानेत टाकली सेंट्रल लाइन :

महिला रुग्ण बेचैन असल्याने सलाइन काढून फेकत होती. त्यामुळे डॉक्टरांनी मानेत सेंट्रल लाइन टाकली व त्यांचा रक्तदाब नियंत्रणात आला. रक्त देऊन दुसऱ्या दिवशी सकाळी शस्त्रक्रिया सुरू केली. अडीच तासांनंतर मांसाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. त्याचे वजन १५ किलो ९०० ग्रॅम भरले.

🔰 अंडकोषात मांसाचा गोळा दुर्मीळ बाब :

मांसाचा गोळा अंडकोषापासून तयार झाला होता. पीळ भरल्यामुळे अतिशय वेदना होत होत्या. इतक्या मोठ्या गोळ्याला पीळ भरणे आणि अंडकोषात मांसाचा गोळा होणे ही दुर्मीळ बाब आहे, अशी माहिती डॉ. माधुरी मानवटकर व डॉ. शिल्पा टिपले यांनी दिली.

Pages