देशात सध्या पेट्रोल डिझेल च्या चढलेल्या दराने महागाई चा आलेख वाढत असताना ग्राहक त्रस्त आहेत.आणि अश्यातच जर आणखी भर म्हणून पेट्रोल पंप मालक तुमची लूट करीत आहेत हे लक्ष्यात आल्यावर डोक्याचा संताप उडल्याशिवाय राहणार नाही.असाच एक प्रकार चंद्रपूर शहरातील रामनगर स्थित पेट्रोल पंपावर उघडकीस आला असून या पंपावर भरलेल्या पेट्रोल पेक्षा कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची लूट होत असल्याचा लाईव्ह विडिओ कालपासून प्रचंड वायरल होत आहे.
▶️ खाली बघा व्हिडीओ कशी होते ग्राहकांची लूट 👇
शहरातील रामनगर परिसरातील पेट्रोल पंपावर काल (6 नोव्हेंबर )दुपारी 12 वाजता दरम्यान डॉ. अमित डांगेवार हे आपल्या मोपेड या दुचाकी वाहनात पेट्रोल भरायला गेले असता त्यांनी टंकी फुल केली असता त्यांना 6 लिटर 11 पॉईंट ही रिडींग दिसली त्यांना पेट्रोल बद्दल शंका आल्याने त्यांनी मोपेड मधील पेट्रोल काढून मोजले असता त्यात फक्त पांच लिटरच पेट्रोल निघाले उर्वरित एक लिटर अकरा पॉईंट पेट्रोल गेला कुठं ? याचा जॉब पंप कर्मचाऱ्यांना विचारत असता कुणी तरी हे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून समाज माध्यमातून प्रकाशित केले.
या संदर्भात डॉक्टर डंगेवार यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली व पेट्रोल पंपावर महागडा पेट्रोल - डिजल भरत असतांना जागरूक पणे इंधन भरण्यापूर्वी रिडींग लक्षपूर्वक बघा व फसवणुकिला बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केली आहे.
एकीकडे दिवसां - दिवस महाग होत असलेल्या पेट्रोल - डिजल ग्राहकांना याबाबत पंपधारक हेरा - फेरी करत असल्याचे समोर आले असून ग्राहकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.