स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे गरीब गरजु कुटुंबाला दिवाळीसाठी किराणा किटचे वाटप:#warora - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे गरीब गरजु कुटुंबाला दिवाळीसाठी किराणा किटचे वाटप:#warora

Share This

 

खबरकट्टा /चंद्रपूर : वरोरा : 


स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने तालुक्यातील नवीन सोईट येथे गरीब गरजु कुटुंबाला दिवाळी साजरी करण्यासाठी किराणा किट वाटप करण्यात आली.

             


  दिवाळीसारख्या सणात गरीबांच्या जिवनात आनंद निर्माण व्हावा, त्यांनाही सण साजरा करता यावा, त्यांची दिवाळी अंधारात जावु नये, यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणुन त्यांना दिवाळीत लागणारी किराणा मालाची किट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात भेट देण्यात आली.


  संकटाच्या समयी सामान्य जनतेच्या पाठीशी राहण्याची हमी रवि शिंदे यांनी दिली आहे.

                किराणा किट वाटप करताना माढेळी गावचे प्रदिप देवतळे, नविन सोईट येथील अरूणराव ठावरी, अक्षय ढोबळे, निलेश मांडवकर, निखील कांबळे, भोजराज चनेकर, रोशन नैताम, प्रफुल जवादे, शुबोद दखने आणि सोईट येथील नागरीक उपस्थित होते.




Pages