राष्ट्रसंतांच्या पुण्यस्मरण निमित्ताने राजुऱ्यात सर्वधर्मीय प्रार्थणेचे आयोजन:#rajura - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राष्ट्रसंतांच्या पुण्यस्मरण निमित्ताने राजुऱ्यात सर्वधर्मीय प्रार्थणेचे आयोजन:#rajura

Share This


खबरकट्टा /चंद्रपूर :राजुरा:


मानवतेचे महान पुजारी,ग्रामगीता ग्रंथाचे रचियते राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 53 व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने साईनगर राजुरा येथे सर्वधर्मीय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.

श्री गुरुदेव सेवा मंडळ साईनगर राजुरा द्वारा आयोजित या प्रार्थना सभेत बौद्धधर्म भास्कर करमनकर, शिखधर्म गुरु हरदिपसिंग, ख्रिश्चन धर्म के.पाल चर्च पास्टर, मुस्लिम धर्म मोहम्मद सलीम शेख इत्यादी प्रतिनिधींनी आपआपल्या धर्माच्या प्रार्थना म्हटल्या, आयोजन समितीचे वतिने त्यांना ग्रामगीता ग्रंथ भेट देवून सन्मानित करण्यात आले,मोहनदास मेश्राम यांनी राष्ट्रसंताचा जीवनपाठ वाचून दाखविला अशाप्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमस्थळी महिला-पुरुषांचे भजनसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.भजनसंमेलनाचे उदघाटन अरुण धोटे नगराध्यक्ष राजुरा यांचे हस्ते झाले, अध्यक्षस्थानी ॲड.राजेंद्र जेनेकर केंद्रीय सदस्य प्रचार विभाग गुरुकुंज आश्रम होते, अतिथी म्हणून सौ.संध्या चांदेकर नगरसेविका, वज्रमाला बतकमवार सभापती, हरविंदरसिंग संधु सभापती होते, या संमेलनात राजुरा शहरातील 12 भजनमंडळींनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त बाबुमिया शेख आणि गुरुकुंज मोझरी येथे भजनसेवा देणारे श्रीगुरुदेव सेवा मंडळ सास्ती मंडळाचा सत्कार करण्यात आला.


सकाळच्या सत्रात सामुदायिक ध्यानपाठानंतर राजुरा शहरातून प्रथमतः रामधून काढण्यात आली त्यावेळी राष्ट्रसंताचे प्रतिमेचे पुजन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले रामधून हा सेवा मंडळाचा ग्रामनिरिक्षणाचा वैशिष्ट्य पुर्ण कार्यक्रम असून याद्वारे ग्रामस्वच्छतेच्या कार्याला प्रोत्साहन मिळत असते असे मत नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी व्यक्त केले,रामधून मध्ये चिन्मयी माथने, अभीनव यमनुरवार,लक्ष देठे, तश्या यमनूरवार, आराध्या देठे, मयूरी जुनघरे, ओम पावडे,प्रतिक कावळे, वेदांत कोहपरे,सुजित कावळे आदी गुरुदेव सेवक,शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामु.ध्यानपाठावर अनिल चौधरी व सामुदायिक प्रार्थनेवर गुणवंत भद्रावतीकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रवंदना गायनाने झाला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष पावडे संघटक तर आभारप्रदर्शन मनोहर बोबडे यांनी केले, कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी लटारु मत्ते, मारोती सातपुते, सुरेश बोंडे, रत्नाकर नक्कावार,चरणदास मोते, ऋषी निमकर,सुनिल बोढे, मोरेश्वर थिपे, अजय तंगडपल्लीवार, राजकुमार चिंचोलकर, यादव कुळमेथे, जयप्रकाश बोबडे, आनंदराव ताजने, शंकर चहारे, पुंडलिक उरकुडे, गुंतीवार यांनी अथक परिश्रम घेतले.

Pages