गुरुदेव सेवा मंडळास समई तर नेफडो ला दिली रक्कम भेट.
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा
स्थानिक राजुरा येथील सेवानिवृत्त वनपरीक्षेत्र अधिकारी स्वर्गीय वसंत लढी यांच्या चौथ्या पुण्यस्मरण निमित्य राजुरा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांस्कृतिक सभागृह, साई नगर येथे वृक्षारोपण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग अध्यक्ष बादल बेले यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाला त्यांच्या कुटुंबंतील कमल वसंत लढी, सुरेश लढी, सुलोचना रोहणे, उमेश लढी, रंजना लढी, सीमा लढी, गुरुदेव सेवा मंडळाचे सुभाष पावडे, शैलेश कावळे, सुनील बोढे, राजकुमार चिंचोलकर, चरणदास मोते, नेफडो चे तालुका अध्यक्ष संतोष देरकर, उपाध्यक्षा रजनी शर्मा, सुनैना तांबेकर, मोहनदास मेश्राम, सर्वानंद वाघमारे, भास्कर करमरकर,जयपूरकर संदीप आदे, आशिष करमरकर, नितीन जयपूरकर, सैय्यद आसिफ, अभिषेक बाजूजवार, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी सांस्कृतिक सभागृह परिसरात विविध प्रकारच्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व स्व. वसंत लढी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर लढी व रोहणे परिवारातर्फे गुरुदेव सेवा मंडळास मोठी समई तर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेला सामाजिक कार्याकरिता एक हजार रुपये रक्कम भेट स्वरूपात देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश लढी यांनी केले. प्रास्ताविक मोहनदास मेश्राम यांनी तर आभार सुभाष पावडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता मौन व शांतीपाठ घेऊन झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगताने स्व. वसंत लढी यांच्या व त्यांच्या परिवारामार्फत होत असलेल्या सामाजिक कार्याविषयी विचार व्यक्त केले.