लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील लक्ष्मीकडूनच स्वीकारला विशेष पुरस्कार
खबरकट्टा /चंद्रपूर : ब्रम्हपुरी:-
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी, मुंबई ह्या नावाजलेल्या संस्थेमार्फत संस्थापक मा.कृष्णाजी जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षांपासून आपल्या राज्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विशेष मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असतो. पण यंदाचा पुरस्कार सोहळा कोरोनाच्या काळात होऊ शकला नाही. त्यामुळे संस्थेने संबंधित निवड केलेल्या सर्व पुरस्कार विजेत्यांना ट्रॉफी, मानाचा फेटा, मेडल, सन्मानपत्र, मानाचा वस्त्र अश्या पद्धतीने पार्सल बॉक्स मध्ये पाठवून गौरविण्यात आले.
सदर संस्थेमार्फत ब्रम्हपुरी मधील सामाजिक युवा कार्यकर्ते उदयकुमार सुरेश पगाडे यांची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. संस्थेकडून पार्सल स्वरूपात आलेला, "राज्यस्तरीय आदर्श युवक समाजरत्न युथ आयडल अवॉर्ड -२०२१" , हा पुरस्कार दिवाळीच्या शुभपर्वावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आल्यामुळे उदय पगाडे यांनी आपल्या घरची लक्ष्मी, जन्मदाती आई श्रीमती.मायाताई सुरेश पगाडे यांचा हस्ते पुरस्कार स्वीकारला. स्वर्गीय वडील सुरेश पगाडे यांच्या मार्गदर्शनात राहून मोठाभाऊ तुषार आणि लहानभाऊ प्रितम यांच्या सोबतीस सामाजिक क्षेत्रात उतरून समाजसेवा करणाऱ्या उदय पगाडे ह्यांचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा चाहतावर्ग आणि विविध वरिष्ठ व्यक्तींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.