राज्यात नगर परिषद निवडणुका जाहीर:#election - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राज्यात नगर परिषद निवडणुका जाहीर:#election

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर :


राज्यातील 105 नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानी जाहीर केला असून, या निवडणूका 21 डिसेंबर 2021 रोजी संपन्न होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, जिवती, पोंभुर्णा कोरपना या नगरपंचायत चा समावेश आहे.

1 ते 7 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्रे स्विकारले जाणार असून, नामनिर्देशनपत्राची छानणी व उमेदवारांची अंतिम यादी 8 डिसेंबर रोजी प्रकाशीत केली जाणार आहे.​ दिनांक 13 डिसेंबर रोजी नामनिर्देशनत्रे परत घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर दुसरे दिवशी चिन्हाची वाटप केले जावून उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशीत केली जाईल व 21 तारखेला निवडणूक घेण्यात येईल. या निवडणूकीची मतमोजणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे.

Pages