खबरकट्टा/चंद्रपूर :
पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे दिनांक ०८/१०/२०२१ रोजी ट्रेडवीन मल्टीसर्वीस प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या गुंतवणुकदारांच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक ४१६/२०२१ कलम ४२०, ४०६, ४०९, १२०(ब) भा.दं.वि. सहकलम ३, ४ महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम १९९९ अन्वये ट्रेडवीन मल्टीसर्वीस प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीचे संचालक शेखर निबाजी साखरे, रा. चंद्रपूर व ईतर तीन यांचे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने गुंतवणुकदारांची २,८४,०८,६००/- ( दोन करोड चौयांशी लाख आठ हजार सहाशे ) ईतकी फसवणुक संबंधीत कंपनीने केल्याचे दिसुन येत आहे. तरी याद्वारे आवाहन करण्यात येते की, ट्रेडवीन मल्टीसर्वस प्रायव्हेट लिमीटेडच्या ज्या गुंतवणुक दारांची फसवणुक झालेली आहे. त्यांनी त्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक व गुंतवणुकी संबंधाने त्यांचेकडे असलेली कागदपत्रे घेवुन विनाविलंब आर्थिक गुन्हे शाखा कार्यालय, चंद्रपूर (दुर्गापुर पोलीस स्टेशनच्या आवारात) येथे जावुन माहिती द्यावी व पुरावा कागदपत्रे जमा करावीत.