जुनोना येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी:#prem-jarpotwar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



जुनोना येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी:#prem-jarpotwar

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर :


चंद्रपूर तालुक्यातील जुनोना गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जुनोना येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री मन्सराम आत्राम यांनी सर्व प्रथम क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आणि उपस्थित प्रमुख पाहुणे व शिक्षकांरुंद यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री मन्सराम आत्राम व प्रमुख मार्गदर्शक म्हणून जुनोना गावात मुलांचे स्वयंप्रेरणेने अभ्यासवर्ग घेत, विविध उपक्रम, स्पर्धा, महापुरुष यांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करणे असे विविध उपक्रम राबवित असलेले शिक्षणप्रेमी प्रेम जरपोतवार यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनोना येथील कु. चंदा पुट्टवार, सौ उषा इटनकर, श्रीमती सुमित्रा चौधरी, कु ज्योती लहामगे, श्री प्रकाश गोरे, श्री प्रफुल्ल करवाडे  आदी शिक्षकरुंद उपस्थित होते. आणि विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन विध्यार्थीनी कु. सलोनी उराडे तर आभार कु. सिद्धी वेलादी या विध्यार्थीनीने केले.







Pages