⚫️वेकोली चंद्रपूर क्षेत्राच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांचा टाहो
⚫️" डॉ.रेणुकादेवी " यांचा हलगर्जीपणा उठला रुग्णाच्या जीवावर...?
खबरकट्टा / चंद्रपूर :
वेकोली हॉस्पिटल चंद्रपूर येथे 33 वर्षीय कामगार मोहम्मद अन्सारी या रुग्णाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मूत्यू झाला.मोहम्मद अन्सारी या रुग्णाला उपचारासाठी चंद्रपूर येथील वेकोली रुग्णालयात भरती केले होते. त्या रुग्णालयात त्या रुग्णाकडे कडे डॉक्टर रेणुका देवी यांनी वेळेवर रेफर दिले नाही. रुग्णाच्या नातेवाईकांनी रेफर मागितले परंतु डॉ.रेणुका देवी यांनी रेफर दिले नाही.त्यानंतर चंद्रपूर क्षेत्राचे एरिया वेलफेअर मेंबर सेजूदिन शेख, सुदामा यादव, घनश्याम यादव, शरद धांडे यांनी सुद्धा रेफर साठी आग्रह केला.परंतु,डॉ. रेणुका देवी यांनी दुर्लक्ष करत दुसऱ्या दिवशी रेफर केलं.
रुग्णाची प्रकृती जास्त बिगडली त्यामुळे रुग्णाला नागपूर हॉस्पिटल घेऊन जास्त असताना त्या रुग्णाचा मृत्यू झाला. मोहम्मद अन्सारी या रुग्णाच्या मृत्यूचे दोषी वेकोली हॉस्पिटल येथील डॉ. रेणूका देवी आहेत असा आरोप रुग्णाच्या नातेवाईक यांनी केला आहे.
डॉ रेणूका देवी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करणाऱ्यात येईल असा इशारा एच. एम. एस. संघटनेचे वेलफेअर मेंबर सेजुदिन, सुदामा यादव, क्षेत्रीय महासचिव नागेश रेड्डी जे. सी सी शरद धांडे, सेफ्टी बोर्ड मेंबर महगी यादव यांनी दिला.