श्री गुरुदेव सेनेच्या महिला धडकला पोलीस स्टेशनवर मुरधोनीत अवैध दारुचा महापूर:#wani - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



श्री गुरुदेव सेनेच्या महिला धडकला पोलीस स्टेशनवर मुरधोनीत अवैध दारुचा महापूर:#wani

Share This

🔰श्री गुरुदेव सेना व बचत गटाच्या महिलांची मुरधोनी गावात अवैध दारू विक्री बंदीसाठी पोलीस स्टेशनला मागणी


खबरकट्टा / यवतमाळ :वणी -
वणी : येथून जवळच असलेल्या मुरधोनी गावात अवैध दारू विक्रीने जोर पकडला असल्याने श्री गुरुदेव सेना व बचत गटाच्या संतप्त महिलांनी आज ता. दुपारी ४ वाजता चक्क पोलीस स्टेशनर धडक दिली व तात्काळ कायम स्वरूपी दारू बंदीची मागणी केली.


मागील ४ ते ६ महिन्यापासून गावातील काही गावगुंड लोक अवैध दारू विकून कायदा व सुव्यवस्था भंगवत होते. त्यामुळे महिलांवर अत्याचार वाढत होते. तर शाळकरी मुले देखील व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरन निर्माण झाले आहे. महिलांना रस्त्याने जाणे येणे करणे देखील कठीण झाले होते. त्यामुळे महिलामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असल्याने श्री गुरुदेव सेनेचे तालुका संघटक भारत कारडे, महिला संघटिका प्रिया फालके, ग्रा. पं. सदस्य, पंढरीनाथ राजूरकर, प्रकाश धुळे, पूजा आंदे, माजी सरपंच पंढरीनाथ आवारी, व्यसनमुक्ती सदस्य, राहुल धुळे, श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रमुख बेबीताई कारडे यांचे नेतृत्वात सुमारे ५० ते ६० महिला व पुरुशांनी पोलीस स्टेशनवर धडक दिली व दारुबंद करण्याची मागणी केली. यावेळी श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर हे उपस्थित होते. निवेदन देताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टेमुरने यांचे नेतुटवात तात्काळ एक प्रथक तयार करून दारू विक्री करणाऱ्यांवर धाड टाकायला रवाना करण्यात आले होते.


उत्पादन शुक्ल विभागाला नेहमीच असते कुलूप
:
दारूबंदी करिता महाराष्ट्र शासनाचे उत्पादन शुल्क विभाग वणीत कार्यरत असून या कार्यालयाला कर्मचारी नाही म्हणून अधिकारी वर्गा कडून नेहमीच कार्यालयाला कुलूप लावून असते त्यामुळे वरिष्ठांनी तात्काळ दखल घेण्याची मागणी श्री गुरुदेव सेनेच्या महिलांनी केली आहे.

Pages