🔰वीज दुर्घटनेतील आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबियांना गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके यांनी दिली भेट
खबरकट्टा /चंद्रपूर :जीवती
तालुक्यातील चिखली पाटण येथे वीज पडून बकऱ्या राखणारे सौ. कमलाबाई धर्मराव मेश्राम (महिला-36) आणि नागेश रामशाव कोटनाके (मुलगा 27) गंभीर जखमी झाले व त्यांना गडचांदूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि त्यात 25 बकऱ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली.
या घटनेची माहिती मिळताच गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला त्यात गावाकऱ्यांचे कुणाचे 4 तर कुणाचे 5 अशा बकऱ्यांचे नुकसान झाल्याची बाब लक्षात आली. त्या नुकसानग्रस्त नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन गजानन जुमनाके यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना दिले.