गोदरुजी पाटील जुमनाके यांच्या स्वप्न पूर्तीसाठी कामाला लागा :-#rajura - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



गोदरुजी पाटील जुमनाके यांच्या स्वप्न पूर्तीसाठी कामाला लागा :-#rajura

Share This

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

गोंडवाना गणतंत्र पार्टीची राजुरा तालुका कार्यकारणी गठीत

खबरकट्टा /चंद्रपूर :राजुरा


राजुरा- गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या पदाधिकारी निवड व आगामी ग्राम पंचायत,पं.स./जि.प. आणि नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकी संबंधात चर्चा करण्यात करीता गोंडवाना गणतंत्र पार्टी कार्यकर्त्याची बैठक आज (९ आक्टोंबर) नगाजी महाराज सभागृह देशपांडे वाडी राजुरा येथे घेण्यात आली.



गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला प्रदेश महासचिव अब्दुल जमीर अ.हमीद, जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी,कोर कमेटी अध्यक्ष पांडुरंग जाधव, प्रदेश प्रवक्ता मेहबूब भाई शेख, प्रदेशसंघटन मंत्री नामदेव शेडमाके, किसान महापंचायत महासचिव विजयसिंह मडावी, जिल्हा महासचिव भारत आत्राम, जिवती तालुका अध्यक्ष ममताजी जाधव, माजी सभापती भिमराव मेश्राम,मेजर बंडूजी कुमरे,संजय सोयाम,प्रभाकर गेडाम, माजी नगरसेवक राधाबाई आत्राम, रामदास आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.


बैठकीत खालील प्रमाणे राजुरा तालुका पदाधिकारी निवड करण्यात आले. राजुरा तालुका अध्यक्ष अरूण उदे, तालुका उपाध्यक्ष प्रकाशजी वेडमे आर्वि-पाचगाव क्षेत्र, सुखदेव गेडाम सास्ती-गोवरी क्षेत्र, अविनाश टेकाम चुनाळा-विरूर क्षेत्र, गुलाब करके देवाडा- डोंगरगाव क्षेत्र, तालुका सचिव पदावर सुरेश जुमनाके व जिवनदास किन्नाके यांची नियुक्ती करण्यात आली, धर्माजी मडावी सहसचिव, तालुका युवक पदाधिकारी जयपाल आत्राम तालुका अध्यक्ष, सुमित कोडापे तालुका उपाध्यक्ष, सुरेश पुसाम तालुका उपाध्यक्ष, तालुका महिला पदाधिकारी गिरीजा सदाशिव परचाके तालुका अध्यक्ष, लक्ष्मीबाई पेंदोर तालुका उपाध्यक्ष, संगिता शेखर आत्राम तालुका सचिव, कांता भाऊराव सिडाम तालुका संघटिका, तालुका सोशल मिडिया प्रमुख विशाल तु. मेश्राम व नितेश शा. आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली, सदस्य पदावर प्रशांत टेकाम आणि प्रदिप टेकाम यांची निवड झाली.

या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी तील खालील पदाधिकारी निवडण्यात आले, राजे संजिवराव आत्राम जिल्हा उपाध्यक्ष, भारत आत्राम जिल्हा महासचिव, संतोष कुळमेथे जिल्हा संघटक. या बैठकीत मारोती दत्ता पुरी वांबोरी व मघुकर सुधाकर कोटनाके सोनापुर यांना गोगपा पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले व मारोती पुरी यांची जिवती तालुका ओ.बी.सी. सेल अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात येऊन या निवडणुका वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षासोबत आघाडी करून लढवावी. या निवडणुकीत सर्व समाजघटकांच्या उमेदवारांना सोबत घेऊन गोगपा चा झेंडा कसा फडकेल या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले.


बैठकीला राजे संजिव आत्राम, मंगेश सोयाम,गंगु पाटील कुत्रे, शामराव कोटनाके, रामु पाटील कोडापे. प्रविण मडचापे, नारायण मोगिलवार,संतोष कुळमेथे, अभि परचाके, शंकर आत्राम, संतोष आत्राम, भाऊराव कन्नाके, केशव पाटील कुळमेथे, मधुकर कोटनाके, मारोती पुरी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Pages