खबरकट्टा /चंद्रपूर :कोरपना
तालुक्यातील हिरापूर येथे नुकतेच अंबुजा सिमेंट फाउंडेशन बि.सि .आय उत्तम कापूस उपक्रम ग्रामपंचायत हिरापूर,जि. प. शाळा हिरापूर,स्त्रीशक्ती महिला बचत गट, व स्वराज किसान ग्रुप हिरापूर यांच्या संयुक्त विद्यामाने वृक्षारोपण व वृक्षारोपण दिडी कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये गावातील शेतकरी महिला व पुरुष ग्रामस्थशालेय विद्यार्थी यांनी भजन गाऊन वृक्षदिंडी काढली विवीध फलकाच्या माध्यमातून घोषणा देत जनजागृती करण्यात आली. गावामध्ये तयार होत असलेल्या "डेन्स फॉरेस्ट" येथे ग्रामस्थांच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले. त्याप्रसंगी बि सि आय चे प्रकल्प समन्व्यक संतोष विसरोजवार यांनी जैवविविधता कशी जपली पाहिजे असे सांगत वृक्षारोपनाचे महत्व सांगीतले. पर्यावरण संरक्षनासाठी झाडांचे महत्त्व सांगून मानवी जीवनामध्ये काय फायदा होते या बद्दलही माहिती समजावून सांगण्यात आली.
महिलांसाठी सुरू असलेल्या स्त्रीशक्ती महिला बचत गटाने बि. सि. आय प्रक्षेत्र अधिकारी अनिल पेंदोर यांच्या मार्गदर्शनात तयार केलेल्या दशपर्णी अर्क याचे शेतात फवारणी केल्यानंतर त्यांना काय काय फायदे याविषयी लताबाई काळे यांनी माहिती दिली. त्यांनी तयार केलेल्या 400 लिटर दशपर्णी अर्क इतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरून विषमुक्त शेती करण्याचे आव्हान केले. तसेच प्रगतशील शेतकरी व उपसरपंच हिरापूर अरुण काळे यांनी बि. सि.आय. प्रकल्पाच्या माध्यमातून शेती सुधारणेत होत असलेले फायदे समजावून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अनिल पेंदोर यांनी केले यावेळी सरपंच सुनीता तुमराम, उपसरपंच अरुण काळे प्रकल्प समन्वयक अंबुजा सिमेंट फाउंडेशन बि. सि. आय. संतोष विसरोजवर, रत्नाकर चटप, हबीब शेख, कमलेश नागापुरे,पायल चोप्पावार आदी उपस्तिथ होते.