🔰नियोजन सभापती बाला शुक्ला यांनी ब्रम्हपुरी चे मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी....
🔰कोट तलाव ठरतोय मानवी जीव व पशु साठी जीवघेणा.....
🔰कोट तलावात आतापर्यंत तिघांचा मुत्यु....
🔰तलावात बुडून मृत्यू पावलेली विवाहित रेणुका मानसिक रुग्ण असल्याचे समजते....
खबरकट्टा / चंद्रपूर :ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या जवळील कोट तलाव हे प्राचीन काळापासून अस्तित्त्वात आहे. स्थानिक नगरपरिषद प्रशासनाकडून सरोवर सौदर्यीकरण निधी अर्तंगत तलावाचे काम सुरू करण्यात आले. यामध्ये तलावाच्या खोलीकरणात वाढ करण्यात आली. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची सुविधा स्थानिक नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे काही वर्षा अगोदर पोहण्यासाठी गेला असलेला एक ११ वर्षीय आकाश गांवडे नावाचा मुलाचा बडुन मुत्यु झाले होते. नंतर मौका चौकशी उपविभाग अधिकारी यांनी करून मुख्याधिकारी यांना सुचना फलक व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यासाठी सांगितले. त्यावरून कंत्राटदारां मार्फत एक सुरक्षा रक्षक नियुक्ती करण्यात आले. त्या दिड वर्षाच्या काळात कोणत्याही प्रकारच्या दुर्घघटना या तलावात घडल्या नाही. पण काही मुख्याधिकारी यांनी कंत्राटदाराला आदेश दिले व तेथील सुरक्षा रक्षक हटविण्यात आले. आणि वाल्मिक नगर येथील शिक्षक मेश्राम यांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. आणि आज दिनांक ९ आक्टोबर ला सकाळी १० वाजता दरम्यान रेणुका अभिजित रामटेके वय २५ वर्ष रा. दहेगाव ता. लांखादुर जि. भंडारा ही कोट तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. सदर मुत्युक रेणुका हीचे दोन वर्षा अगोदर लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथील अभिजित रामटेके यांच्या सोबत विवाह झाला होता. पण काही दिवसामध्ये रेणुकाच्या डोक्यात मानसिक फरक वाटायला लागले.
तीला उपचारासाठी अनेक वैद्यकीय डॉक्टर कडे नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले कि मानसिक रुग्ण असुन तीला वेळोवेळी औषधी उपचार सुरू होता. आठ दिवसा अगोदर तिला औषधी उपचारासाठी वडील मनोज सखाराम गोंडाने यांच्या कडे(माहेरी) आणुन दिले होते.आणि आज ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या जवळील कोट तलावात सकाळच्या सुमारास तलावा मध्ये बडुन मुत्यु झाल्याची घटना निर्दशनास आली. लगेच सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले. व (डोंग्याने) शोध मोहीम सुरू केली. तब्बल तीन तासाने रेणुका चा मुत्युदेह सापडला. सदर मुत्युदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून मर्ग दाखल करण्यात आले. व मुत्युदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आले. सदर प्राथमिक तपास उप पोलिस निरीक्षक सुरेद्र उपरे व नरेश रामटेके , प्रकाश चिकराम, योगेश शिवनकर यांनी केले. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करत आह.
प्रतिक्रिया
सदर दुर्घटना ही ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर व बांधकाम अभियंता मनोज आंबोरकर यांच्या दुर्लक्षामुळे झाले असुन यांनी मनमर्जीने सुरक्षा रक्षक काढून टाकले. व सतत वर्षे भरात दोन दुर्घटना घडल्या व मी या दोन्ही बेजबाबदार अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार दाखल केली आहे. जर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. व पुढे अशा प्रकारे दुर्घटना घडु नये यासाठी दोन सुरक्षा रक्षक नेमणूक करण्यात यावी.
दिनकर उर्फ बाला शुक्ला
नियोजन सभापती (नगरसेवक)
नगरपरिषद ब्रम्हपुरी