कोरोना काळात “ग्राम पंचायतीची भूमिका”:ग्राम संवाद सरपंच संघटना व स्व.श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानेमार्गदर्शनपर सामाजिक कार्यक्रम : 14 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता स्थानिक श्री मंगल कार्यालय, भद्रावती #gramsanwad - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



कोरोना काळात “ग्राम पंचायतीची भूमिका”:ग्राम संवाद सरपंच संघटना व स्व.श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानेमार्गदर्शनपर सामाजिक कार्यक्रम : 14 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता स्थानिक श्री मंगल कार्यालय, भद्रावती #gramsanwad

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

ग्राम संवाद सरपंच संघटना व स्व.श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात “ग्राम पंचायतीची भूमिका” या विषयावर दि. १४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता स्थानिक श्री मंगल कार्यालयात मार्गदर्शनपर सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र श्रीनिवासराव शिंदे हे राहणार असून विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब बराटे,तहसिलदार महेश शितोळे,पोलिस निरीक्षक गोपाल भारती, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर,ग्राम संवाद सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस निलेश पुलगमकर हे उपस्थित राहतील तर प्रमुख अतिथी म्हणून वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, चंद्रपूर येथिल फिमेल एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा जेष्ठ अधिवक्ता ऍड.पुरुषोत्तम सातपुते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. विजय देवतळे, फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा जेष्ठ अधिवक्ता ऍड. विजय मोगरे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

यावेळी मान्यवर अतिथींचे मार्गदर्शन लाभणार आहे.या मार्गदर्शनपर कार्यक्रमामध्ये तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच महिला बचत गट यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मार्गदर्शक ऍड. देवा पाचभाई जिल्हा अध्यक्ष रिषभ दुपारे, सचिव प्रशांत कोपुला, व पानवडाळा ग्राम पंचायतचे जेष्ठ सरपंच प्रदिप महाकुलकर यांनी केले आहे.

Pages