⭕️आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या मार्गदर्शनात व सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो तरुण-तरुणी तसेच महिला व पुरुषांचा युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश_
⭕️या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे प्रस्थापितांना धक्का देत सुरज ठाकरे यांनी आपले नेतृत्व परत एकदा सिद्ध करत राजुरा येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करून नगरपंचायतीच्या व ग्रामपंचायतीच्या तथा इतर येणाऱ्या निवडणुकांसाठी दंड थोपटले आहेत.
⭕️या सोहळ्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते. परंतु विशेषता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेतला
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
सविस्तर वृत्त असे की दिनांक:- ८/०८/२०२१ रोजी युवा स्वभिमान पार्टी चंद्रपूर तर्फे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे तथा नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. याला राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेने व कामगारांनी तसा तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत त्यांचे नेतृत्व स्वीकारत प्रस्थापित नेत्यांना नकार दिला आहे. राजुरा विधानसभा क्षेत्र मध्ये असलेल्या सिमेंट उद्योग व कोळसा खाणी यामध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य न देऊ शकल्याने आजी-माजी व प्रस्थापित नेत्यांन बाबतची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचाच फायदा लढवय्या नेतृत्व सुरज ठाकरे यांना होत आहे.
आजी माजी वरिष्ठ नेत्यांचे वय पाहता व जनतेने सातत्याने त्यांना दिलेल्या संधीचे ते सोने करू शकले नाहीत यामुळे बेरोजगार व कामगारांकरिता सातत्याने लढत असलेले सुरज ठाकरे हे नाव आता या लोकांनी स्वीकारले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राने वामनराव चटप यांना तीनदा नेतृत्व करण्याची संधी दिली. तसेच सुभाष धोटे यांना देखील राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली याशिवाय एकदा संजय धोटे त्यांना देखील संधी दिलेली आहे. परंतु आता या सर्वांचं नेतृत्व हे बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासारखे नसल्यामुळे व म्हणावा तसा विकास या विधानसभा क्षेत्राचा केला नसल्याने विधानसभा क्षेत्रातील लोकांना एक नवा चेहरा सुरज ठाकरे यांच्या रुपाने मिळाला. व तो त्यांनी आता स्वीकारलेला आहे. असे एकंदर चित्र सध्या दिसत आहेत.
२००९ मध्ये सुरज ठाकरे यांना प्रस्थापित नेत्यांनी हलक्या मध्ये घेण्याची चूक केली होती. परंतु 2009 मध्ये सुरज ठाकरे यांचा चाहता वर्ग व पाठीशी असलेले लोक आज तिप्पट संख्येने वाढलेले आहेत. त्यामुळे आता तरी सुरज ठाकरे यांना प्रस्थापित पक्ष व नेते हलक्याने घेण्याची चूक करतील असे वाटत नाही.
कोरोना काळामधील लॉकडाऊन पासून राजुरा विधानसभासह चंद्रपूर जिल्ह्यातील इतरही तालुक्यामधील युवक-युवतींचा युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे हे सातत्याने गोरगरीब जनतेच्या समस्या मार्गी लावत आहेत त्यांचे कार्य पाहून व विशेष म्हणजे त्यांच्या कामाची पारदर्शकता तथा स्थानिक पातळीवरील सक्रियता पाहून प्रेरित झालेल्या युवकांनी श्री. सुरज ठाकरे यांना बरेच दिवसापासून पक्षात सामील होऊन काम करण्यासाठी आग्रह केला पण सततच्या होणाऱ्या लॉक डाऊन मुळे बरेच दिवसापासून हा पक्षप्रवेश सोहळा लांबत होता अखेर दिनांक ०८/०८/२१ रोजी राजुरा मधील सम्राट लॉन येथे हा पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला याप्रसंगी युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अमरावती येथील बडनेरा क्षेत्राचे आमदार श्री रवी राणा व खासदार सौ नवनीत राणा यांनी पक्ष प्रवेश घेतलेल्या सर्व जनतेचे स्वागत केले आभार मानले तथा लाईव्ह च्या माध्यमातून मार्गदर्शन देखील केले व जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे याप्रसंगी सांगितले. तथा जनतेवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये उभारलेल्या लढ्या मध्ये सुरज ठाकरे यांच्या पाठीशी सर्व ताकतीने आहोत हे देखील आवर्जून सांगितले आहे. सुरज ठाकरे यांच्या पाठीशी एवढी मोठी जनता असल्यामुळे आता निश्चितच येत्या राजुरा नगर परिषदेला प्रस्थापितांना धक्का देण्याची तयारी सूरज ठाकरे यांनी दाखवली असून प्रस्थापित नेते व पक्षांच्या विरोधात दंड थोपटले आहे.
यावेळी नितेशभाऊ बेरड (कोरपना तालुका उपाध्यक्ष) रवींद्र गेडाम ( शहर उपाध्यक्ष, गोंडपिपरी) समीरभाऊ देवगडे (तालुका सचिव कोरपना) सुनीलभाऊ शेळके ( तालुका उपाध्यक्ष, जिवती) जीवन तोगरे ( तालुका अध्यक्ष जिवती ) विशाल टेम्भूर्डे ( सोसिअल मीडिया प्रमुख, कोरपना तालुका)शामा हिवरे ( तालुका उपाध्यक्ष, राजुरा) अब्दुल शोएब शेख( अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष, राजुरा) अमोल अशोक ताटे, मंगेश दादाजी वडस्कर ( तालुका उपाध्यक्ष, राजुरा) स्वप्नील मारोती वाढई ( तालुका उपाध्यक्ष, राजुरा, विहीरगाव) पवन चिंतल ( शहर सचिव, राजुरा ) विश्वास मालेकर (युवा सेना अध्यक्ष, कोरपना तालुका) सुनील रामचंद्र चोथले ( युवा सेना उपाध्यक्ष, राजुरा)मंगेश काडुकर ( तालुका उपाध्यक्ष, गोंडपिपरी ) विलास विश्वेश्वर मेश्राम ( कार्याध्यक्ष, गोंडपिपरी) मारोती वक्तु मेश्राम (सचिव, गोंडपिपरी ) आशिष मारोती आगरकर ( शहर अध्यक्ष, गडचांदूर ) योगेंद्र मारोती ठाकरे ( शहर उपाध्यक्ष, गडचांदूर) अशाप्रकारे जबाबदारी देण्यात आलेली आहे.